महाबळेश्वर:
काय ते महाबळेश्वर…. काय तो गारवा….अन काय ते वातावरण….काय ती झाडी ….काय ती थंडी… सगळे एकदम ओकेच.. अशी एकदम झकास ट्रीप वडगाव मावळ शहरातील युवकांनी अनुभवली..या युवकांना महाबळेश्वर ट्रीप चा आनंद…मिळवून दिला,सह्याद्री फाउंडेशनने.

नगरसेवक व सह्याद्री फाउंडेशनचे  संस्थापक अध्यक्ष सुनिल ढोरे व नगरसेवक मंगेश खैरे यांच्या पुढाकाराने या ट्रीपचे आयोजन करण्यात आले होते. रोजच्या धकाधकीच्या जीवनात काहीसा आनंद मिळवून देण्याचा सह्याद्री प्रतिष्ठानचा प्रयत्न यशस्वी झाला.

रोजची धावपळ…. ताण तणाव कमी करण्यासाठी निसर्गाच्या सान्निध्यात.. महाबळेश्वरच्या येथील थंड हवेत १२५ युवकांनी  ट्रीपचा आनंद घेतला.

मावळात धनाढ्य मंडळी  लयच आहे. अनेकांकडे पैसा आहे. पण  निस्वार्थी पणे खर्च करण्याची दानत फार कमी  लोकांकडे आहे  .काहीजण खर्च करतात  पण हच्चा राखूनच. राजकारणातील  प्रत्येक व्यक्ती ही जेव्हा खर्च करते त्यावेळी त्याचा काहीतरी स्वार्थ असतो.

या उटत सुनील ढोरे  कुठलाही स्वार्थ न ठेवता जीवाभावाच्या युवकांना घेवून महाबळेश्वर ट्रीपला नेले.राहयची सोय ते नाश्ता पासून ते पासून जेवणा पर्यंत उत्तम सोय केली. एवढेच नाही तर सायंकाळी रम्य वातावरणात ऑर्केस्ट्रा देखील ठेवला होता.हिंदी मराठी गाण्यांची मैफील ऐकता सगळ्यांनी आनंद  लुटला.

सुनील ढोरे यांचा स्वभाव,  निस्वार्थी पणा, प्रत्येकाला मदत करणे यामुळे आज वडगाव शहरातील तरूण पिढी त्यांच्या भागे भक्कम पणाने उभी असल्याचे हे तरूण सांगत होते.

या तरूणांच्या ट्रीप मध्ये
आमदार सुनील शेळके, गणेश खांडगे,  विठ्ठलराव शिंदे व अन्य पदाधिकारी सहभागी होऊन तरूणांशी हितगुज साधत त्यांच्या आनंदात सहभागी होणार होते.परंतू लग्न सोहळे,  कृषी उत्पन्न बाजार निवडणुक त्यामुळे त्यांना येता आले नाही. मात्र आमदार सुनील शेळके, मावळ राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष गणेश खांडगे यांनी व्हिडिओ वरून शुभेच्छा दिल्या.

शेळके म्हणाले ,” सुनील ढोरे यांचे समाज कार्य स्तुत्य आहे.युवकांचा संच त्यांच्या मागे खंबीरपणे उभा आहे. आमची येण्याची खूप इच्छा होती पण कामामुळे येता आलें नाही सुनील व त्यांच्या सर्व सहका-यांना मी मनापासून शुभेच्छा देतो, त्यांच्या आशा अकांशा पूर्ण होवो ही पोटोबा महाराज यांच्या जवळ  प्रार्थना करतो.  यावेळी  गणेश खांडगे यांनी देखील शुभेच्छा दिल्या.

  सुनील ढोरे म्हणाले,” मी ही ट्रीप नेली. ही कोणतेही निवडणुक डोळ्यासमोर ठेवून नेली नाही  जीवाभावाचे मित्र आहेत.त्यांचा ताणतणाव कमी व्हावा यासाठी महाबळेश्वर ट्रीप नेली आगामी काळात माझ्या सह्याद्री फांऊडेशन व जीवाभावाचे मित्र यांना न्याय देण्यासाठी त्यांच्या मागे भक्कम पणाने उभा राहून  प्रयत्न करणार.

या सहलीत सुनील ढोरे, मंगेश खैरे, विजय सुराणा, चंद्रजीत वाघमारे,राजेश बाफना, विशाल वहिले,राहूल ढोरे, अतुल राऊत, सोमनाथ धोंगडे,  शरद ढोरे, विकी ढोरे, आनंद बाफना, भाऊ कराळे, प्रविण ढोरे, अलताफ सैय्यद,गणेश माळसकर संभाजी येळवंडे , राजेश ढोरे,सचिन वाडेकर ,राहुल ढोरे ,आबा ढोरे, अमोल ढोरे, गणेश ढोरे, विशाल चव्हाण ,मयूर गुरव,अतुल ढोरे ,जयदीप ढोरे , तुषार वहिले,राकेश वहीले, अनिल कोद्रे प्रविण ढोरे, अलताफ सैय्यद,विशाल चव्हाण यांच्या सह अन्य जण उपस्थित होते.

जय मल्हार हाॅटेलचे मालक किरण ढोरे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला.

error: Content is protected !!