तळेगाव दाभाडे:
तळेगाव दाभाडे शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने दिवंगत नेते खासदार गिरीष बापट यांच्या आठवणींना उजाळा देत सर्वपक्षीय श्रध्दांजली अर्पण केली.

पुणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार,पुणे जिल्ह्याचे माजी पालकमंत्री,तळेगाव दाभाडे नगरीचे कर्तृत्ववान सुपुत्र अशी ओळख असलेल्या स्व.गिरीष बापट यांच्या आठवणीत तळेगाव करांच्या डोळ्याच्या कडा ओल्या झाल्या.

स्व.बापट साहेब यांच्या प्रतिमेला ज्येष्ठ मार्गदर्शक श गणपतराव काळोखे गुरुजी आणि मान्यवरांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण  करण्यात आले. माजीमंत्री  बाळा  भेगडे, आमदार सुनिल शेळके,जिल्हाध्यक्ष  गणेश भेगडे,संत तुकाराम सह.साखर कारखाना उपाध्यक्ष  बापूसाहेब भेगडे,राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष  गणेश खांडगे,जनसेवा समिती संस्थापक अध्यक्ष किशोर  आवारे,माजी नगराध्यक्ष रविंद्रनाथ दाभाडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष गणेश काकडे,भारतीय जनता पक्ष शहराध्यक्ष रविंद्र बाळासाहेब माने, माजी उपनगराध्यक्ष  सुनिल  सैंदाणे,कलापिनी संस्था विश्वस्त डॉ. अनंत परांजपे,डॉ.शाळिग्राम भंडारी,मनसे नेते  सचिन भांडवलकर,रिपब्लिकन पक्ष अध्यक्ष  संदिप शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस महिला अध्यक्षा शैलजा काळोखे,शिवसेना शहर प्रमुख दत्तात्रय भेगडे,शहर प्रमुख देवा खरटमल,ज्येष्ठ कार्यकर्ते श दत्तात्रय मेढी काका, दौलत भेगडे उपस्थित होते.

सर्व मान्यवरांनी स्व.बापट साहेब यांच्या कार्याचा गौरव करून त्यांच्या आठवणींना उजाळा दिला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सरचिटणीस  प्रमोद  देशक आणि सरचिटणीस  विनायक भेगडे यांनी केले.
या कार्यक्रमास सर्वपक्षीय नेते,पत्रकार बंधू,कार्यकर्ते,विविध संस्था पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे नियोजन व सहकार्य भाजपा नेते  अशोक. काळोखे आणि भारतीय जनता पक्ष तळेगाव दाभाडे शहर कार्यकारिणी,मोर्चा – आघाडी पदाधिकारी यांनी केले.

error: Content is protected !!