तुमच्या आमच्यात दडलेला- एक खुजा—!
मित्रांनो—वैद्यकीय व्यवसाय करीत असताना अनेक प्रसंग अंतर्मुख करणारे असतात! .काहीतरी विचार देऊन जातात! यासंदर्भात मला आठवतंय की — चांदखेडचा एक रुग्ण वैद्यकीय उपचार संपल्यानंतर त्याचं उर्वरित आयुष्य त्याच्या नशिबावर सोपवून त्याला तळेगाव येथील भंडारी हॉस्पिटल मधून चांदखेडला मी माझ्या मारुती व्हॅनमधून घेऊन जात होतो! ते मे महिन्याचे दिवस होते-
भरदुपारची 12 ची वेळ होती!
मारुतीव्हॅन मध्ये हा रुग्ण, त्याचा मुलगा त्याची पत्नी असे मागे सर्व बसलेले होते! चांदखेडच्या खिंडित गाडी चढावर असताना लांबवर एक व्यक्ती डोक्यावर पंधरा-वीस किलोचं ओझघेऊन जाताना मला लांबून दिसली! उन्हामुळे अंगाची लाही लाही झालेली अशावेळी सर्वप्रथम माझ्या मनात विचार आला की, या माणसाला आपण गाडीत घ्यावं कारण माझ्या शेजारची जागा मोकळी होती! तळेगाव- चांद्खेड या रस्त्यावर माझ्या क्लिनिकला जाण्याच्या व येण्याच्या वेळात कोणीही पायी चालत असताना मला जर दिसला तर त्याला गाडीतून लिफ्टदेणे हा माझा नेहमीचा स्वभाव बहुतेकांना माहीत होता!
त्या व्यक्तीला लिफ्ट देण्याचा विचार मनात आला, तोच माझ्या गाडीच्या आवाजाने त्या गृहस्थाने मागे वळून पाहिले. त्याबरोबर मी त्याला चटकन ओळखलं आणि हो त्याला ओळखल्यानंतर माझं एक मन म्हणायला लागलं की ,”त्याला गाडीत घेऊ नको!”
अर्थात मित्रांनो त्याला कारणही तसंच घडलेलं होतं!— आठ-दहा दिवसांपूर्वी हा गृहस्थ तापाने फणफणलेला होता1
त्याच्या घरी मी औषधोपचाराला व्हिजिटला गेलो असताना, उपचाराचे पैसे नंतर आणून देतो असे सांगून त्याने वेळ मारून नेली होती! दोन दिवसानंतर कंपाउंडर बिल मागायला गेला असताना आपल्याला डॉक्टरांच्या औषधाचा गुण आलाच नाही म्हणून मी डॉक्टरांचे बिल देऊ कशाला?- अशी उर्मटभाषा वापरून त्याने आमच्या कंपाउंडरचा अपमानही केला होता!
मित्रांनो –हे सर्व एखाद्या विजे सारखं माझ्या मनात एकाक्षणात चमकून गेल! माणसाचं मन खरोखरच विचित्र असतं म्हणूनच आपल्या मना विषयी बहिणाबाई म्हणतात–
मन वढाय वढाय जसं उभ्या पिकातलं ढोर-
आता होतं भुईवर गेलं आभाळात
गेलं गेलं आभाळात!– उर्वरित भाग उद्याच्या अंकात!( शब्दांकन ला.डाॅ.शाळिग्राम भंडारी,तळेगाव दाभाडे)
- दादाभाऊ गणपत गायकवाड यांचे निधन
- पंचाहत्तरीनिमित्त निवेदक सुधीर गाडगीळ यांचा विशेष सत्कार व सांस्कृतिक संचित कार्यक्रम
- असवले इंग्लिश मिडियम स्कूल मध्ये बालजत्रेची धूम
- कला-क्रीडा महोत्सवात अति दुर्गम भागातील खांडी शाळेने पटकविला मानाचा तुरा : पाचवी इयत्तेचा नक्ष भोकटे ठरला मावळ तालुकापातळीवरील बुद्धिबळ स्पर्धेचा विजेता
- सांगिसे विद्यालयात सॅनिटरी डिस्पेन्सर व डिस्पोजल मशीनचे उदघाटन