वडगाव मावळ:
साते ग्रामपंचायतीच्या सरपंच  आरती सागर आगळमे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून अहिरवडे मावळ येथील किनारा वृद्धाश्रम येथे फळे व मिठाईचे वाटप करण्यात आले. 

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून  उमेश  गुंड, (अध्यक्ष मराठा विकास संघ महाराष्ट्र राज्य), गजानन कर्णे (उद्योजक), माजी आदर्श सरपंच भाऊसाहेब आगळमे, सुदाम आगळमे,  नाथाभाऊ आगळमे,  सचिन आवटे, ह.भ.प  भरत  आगळमे, संभाजी बोऱ्हाडे (सर ), बंडू आगळमे, सचिन खाणेकर ,परंदवडी गावच्या विद्यमान सरपंच सुलभा भोते, उपसरपंच आम्रपाली मोरे,मा. उपसरपंच  सखाराम काळोखे, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य गणेश बोऱ्हाडे , ऋषीनाथ आगळमे,  संदीप शिंदे,  नितीन मोरे, वर्षा नवघणे, निशा शिंदे, युवा उद्योजक रुपेश खानेकर,प्रसाद मोहिते दत्ता मोहिते उपस्थित होते.

 
यावेळी किनारा वृद्धाश्रम च्या संचालिका प्रीती वैद्य  तसेच त्यांचे सहकारीही उपस्थित होते.
यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रामपंचायत सदस्य वर्षा नवघणे यांनी केले. संभाजी बोऱ्हाडे( सर )यांनी मार्गदर्शन केले. तसेच यावेळी  ऋषिनाथ आगळमे व  रुपेश खानेकर यांनी शुभेच्छा दिल्या.

माजी उपसरपंच नवनाथ शेळके व स्वप्निल आवटे यांनी आभार मानले.

error: Content is protected !!