पुरुषार्थाची लक्षणं. ..
समय सूचकता आणि कृतिशीलता ही पुरुषार्थाची लक्षणे..
होय मित्रांनो,
आपले विचार आणि आपला चांगुलपणा हा आपल्या कृतिशील कर्तुत्वावर समाज ठरवत असतो.परमेश्वराने ज्यावेळी आपल्याला जन्माला घातलेल आहे. या जगात काहीतरी आपण निश्चितपणे काहीतरी करणार आहोत किंबहुना आपण काहीतरी देणारच आहोत हाच हेतू त्या परमेश्वराचा आहे.
आणि काहीतरी देण्याची वेळ आयुष्यात प्रत्येकाल कधी ना कधी येतच असते!आज अशी एकही व्यक्ती नाही की तिच्याकडे समय- संपत्ती आणि बुद्धी या तिघांपैकी एक किंवा दोन अशी त्याची स्वतः मिळवलेली मिळकत नाही?– आणि त्यापैकी त्याची इच्छा असेल तर ती तो निश्चितच देऊ शकतो.
जर ती संधी त्याला मिळून देखील त्याने दिली नाही तर त्याच्यात आणि नदीच्या प्रवाहावर वाहणाऱ्या प्रेत या दोघात काहीच फरक नाही! करण त्या प्रेताला स्वतःचं अस्तित्व नसतं पण सजीव माणसाला स्वतःचं अस्तित्व- संवेदना मात्र निश्चितच असतात.सहानुभूती असते सहिष्णुता असते.
आणि म्हणून त्याच्या भूमिकेवरच समाजातील त्याची प्रतिमा ठरत असते! त्याचा हा पुरुषार्थ सिद्ध करण्याची संधी त्याला नेहमीच मिळत असते! रतन टाटाच फारच सुरेख वाक्य आहे- ते म्हणतात– जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीला परमेश्वराने बुद्धी कधीच सारखी दिलेली नाही.
नाहीतर प्रत्येकजण डॉक्टर वकील- इंजिनियर – आर्किटेक- नेता अभिनेता झाला असता- पण त्याबरोबरच त्या दयाघनाने एक मात्र मानवासाठी निश्चित असं केलेल आहे की-; त्याला आयुष्यात बऱ्याच वेळा त्याचं कर्तुत्व- त्याचा पुरुषार्थ दाखवण्याची संधी तो त्याला देत गेला आहे.
आणि त्या संधीच सोनं करणं हे सर्वस्वी त्याच्याच हातात असतं आणि ते त्यांन करावं ही त्याच्या परिवाराची – त्याच्या समाजाची आणि त्याच्या राष्ट्राची किमान अपेक्षा असते! त्या संधीच आपण प्रत्येक जण सोन करणार आहोत अशी मला खात्री आहे म्हणून आज मी इथेच थांबतो.
( शब्दांकन- ला.डॉ. शाळिग्राम भंडारी,तळेगाव दाभाडे )
- मंगळवार, १२ नोव्हेंबर रोजी संत नामदेवमहाराज जयंती सोहळ्याचे आयोजन
- मावळ मनसेचा बापूसाहेब भेगडे यांना पाठिंबा
- धनगर बांधवांचा अपमान केल्याप्रकरणी सुनील शेळके यांच्याविरोधात तक्रार दाखल करणार – बापूसाहेब भेगडे
- जनतेकडून मिळणारा प्रचंड प्रतिसाद पाहून विरोधकांकडून ‘रडीचा डाव’ – सुनिल शेळके
- रोबोटिक्स कार्यशाळेने विद्यार्थ्यांना दिले तंत्रज्ञानाचे धडे