टाकवे  बुद्रुक:
आंदर मावळाला शहराशी जोडणारा अरुंद रस्ता अजून किती बळी घेतल्यावर रुंदीकरणाने पूर्ण होईल,अशा संतप्त सवाल आंदर मावळकर करीत आहे. याचे कारण असे आहे की, पोटापाण्यासाठी दुचाकीवरून कामाला निघालेल्या वडेश्वरच्या तरुणाचा अपघातात मृत्यू झाला. त्या तरुणाचे काय चुकले की,तो तरूण कामासाठी घरून गेला तो परत आलाच नाही. माघारी आला तो त्याचा मृतदेह.

घरची जबाबदारी संभळणारा तरूण मुलगा अपघातात गेल्याने दु:खात होरपळणा-या कुटुंबीयांचे सांत्वन करण्याची हिंमत कोणातच नव्हती. अरुंद रस्त्यावर अजून किती बळी जाणार या संतप्त चर्चेने जोर धरला होता.

वडेश्वर येथील दुचाकीस्वाराचा अपघाती मृत्यू झाला त्या दु:खात आंदर मावळवासीय डुंबून गेले.
शनिवार (दि. १५) रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास आंदर मावळातील माऊ – दवणेवाडी येथील वळणावर हा अपघात झाला.

वरसू नथुराम लष्करी (वय ३५, रा. वडेश्वर, ता. मावळ) असे अपघाती मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. याप्रकरणी वडगाव मावळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वडगाव मावळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माऊ – दवणेवाडी येथील धोकादायक वळणावर अपघात झाला. . या धडकेत डोक्याला गंभीर इजा झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. पुढील तपास वडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विलास भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली बीट अंमलदार सचिन काळे करत आहे.

मयत वरसु लष्करी दुपारच्या शिफ्टसाठी कामावर जाताना हा अपघात घडला. या वळणावर यापुर्वी देखील याच परिसरातील युवकाने आपला जीव गमावला आहे. हे वळण अपघातीवळण झाल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने या ठिकाणी सुचना फलक लावावे. तसेच रस्ता रुंदीकरण करण्यासाठी आमदार व खासदारांनी निधी उपलब्ध करुन द्यावा, अशी मागणी होत आहे.

error: Content is protected !!