तळेगाव दाभाडे:
  तळेगाव दाभाडे  शहरात  दर रविवारी भरणा-या  आठवडे बाजाराच्या दिवशी मारूती मंदिर चौक ते नगरपरिषद इमारत आणि जिजामाता चौक ते सुभाष चौक येथे वाहतुक  नियोजन करण्यात यावे,तसेच शहरात अपु-या  दाबाने होणारा पाणी पुरवठा नियमित दाबाने करावा अशा दोन मागण्या तळेगाव दाभाडे शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने अनुक्रमे वाहतुक पोलीस निरीक्षक विशाल गजरमल व  नगर परिषदेचे मुख्याधिकारी विजय सरनाईक यांच्याकडे निवेदनाव्दारे मागणी केली.

पुढील रविवार बाजारापासून फरक जाणवेल अशा प्रकारे आश्वस्त करून नियोजनाची ग्वाही वाहतुक पोलीस निरीक्षक गजरमल यांनी दिली असल्याचे भाजपाच्या वतीने सांगण्यात आले.

शहरातील गाव भाग येथे कमी दाबाने आणि अनियमित वेळांवर पाणीपुरवठा होत असल्याने विशेषतः महिला भगिनींना आणि नागरीकांना त्रास सहन करावा लागतो आहे.कृपया या संदर्भात काही तांत्रिक अडचणी असतील तर त्यांचे निराकरण करण्यात यावे.

आणि पाणी सोडण्याचे.त्या त्या भागाचे वेळापत्रक जाहीर करावे जेणकरून नागरिकांची गैरसोय होणार नाही.
कृपया यावर कार्यवाही व्हावी ही मागणी भाजपाने केली.

तळेगाव दाभाडे शहरातील विविध समस्या मुख्याधिकारी सरनाईक यांच्या निदर्शनास आणून देण्यात आल्या.
  संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांना याबाबत कार्यवाही करण्याची सूचना मुख्याधिकारी  सरनाईक  यांनी दिल्या.

यावेळी  भाजपाचे शहराध्यक्ष रविंद्र बाळासाहेब माने,नगरसेविका शोभा भेगडे, सरचिटणीस  रजनी ठाकूर,शोभा  परदेशी,सोशल मीडिया अध्यक्ष उपेंद्र खोल्लम, व्यापारी आघाडी अध्यक्ष निर्मल ओसवाल,ओबीसी मोर्चा कार्याध्यक्ष  सचिन जाधव,ज्येष्ठ कार्यकर्ता आघाडी अध्यक्ष  अनिल वेदपाठक,प्रसिद्धी प्रमुख  विशाल जव्हेरी, कामगार आघाडी सरचिटणीस  आतिश रावळे,ओबीसी मोर्चा प्रसिद्धी प्रमुख अमित भागीवंत, व्यापारी आघाडी सरचिटणीस  ऋषिकेश नागे उपस्थित होते.

error: Content is protected !!