तळोगाव दाभाडे :
  शेती विकासासाठी  घेतलेले बॅंक कर्ज  शेतक-यांनी  शेती विकासासाठीच वापरावे तर घेतलेल्या कर्जाची परतफेड वेळेवर  करावी  असे आवाहन मावळचे आमदार सुनिल  शेळके यांनी केले.

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या तळेगाव  शाखेच्या  नुतनीकरण उदघाटन  प्रसंगी आमदार  शेळके हे बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी  बॅकेचे  अध्यक्ष  डाँक्टर प्रा.दिगंबर  दुर्गाडे हे होते. तर यावेळी  बॅंक  उपाध्यक्ष  सुनिल चांदेरे,  माजी  अध्यक्ष  बबनराव  भेगडे बॅंक कार्यकारी संचालक  अनिरुद्ध देसाईं ,संचालक रवींद्र जोशी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे , गणेश ढोरे ,वैशाली दाभाडे , साहेबराव  कारके, दिपक  हुलावळे , विलास मालपोटे,  शांताराम लष्करी,  संभाजी शिंदे , सुरेश  चौधरी, संदिप  काशीद,दिलीप ढोरे, गणपत भानुसघरे, संजय ढोरे  तसेच विविध  सहकारी  संस्थाचे आजी माजी  पदाधिकारी  बॅक अधिकारी   उपस्थित होते.

बॅकेचे  मावळ तालुक्याचे संचालक  माऊली दाभाडे यांनी  प्रास्ताविक  आणि स्वागत केले. दाभाडे म्हणाले ,” मावळ तालुक्यातील शेती शेतीपुरक व्यवसाय करण्यासाठी  बॅक भरीव अथॅ सहाय्य  करीत आहे.शेतकर्यानी त्याचा लाभ घ्यावा.  आमदार सुनिल  शेळके म्हणाले कर्ज  वेळेवर  फेडुन व्याजातील सवलत मिळवा.

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक  शेतकरी  बांधवाना  शेती  आणि शेतीपुरक व्यवसाय करण्यासाठी भरीव अर्थ सहाय्य करेल अशी ग्वाही  बॅंकेचे  अध्यक्ष प्रा. दिगंबर  दुर्गाडे यांनी दिली.  बॅकेचे  उपाध्यक्ष  सुनिल चांदेरे यांनी  आभार मानले.

error: Content is protected !!