संभाजीनगर :
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेसह लोकसभा आणि विधानसभा निवडणुक महाविकास आघाडी लढणार असल्याची वज्रमुठ विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी बांधली.
वज्रमुठ सभेत अजित पवारांनी महाविकास आघाडीचा कणा असणारे कार्यकर्ते जीवाचे रान करतील, असा विश्वास व्यक्त केला. एकाच हातात घड्याळ,पंजा आणि मशाल आहे, ही वज्रमुठ अशीच एकोप्याने ठेवणार असल्याचा निर्धार पक्का केला.
एकोपा टिकविण्यासाठी आम्ही जीवाचे रान करणार आहोत, आपणही एकोपा टिकवा, असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केला. अजित पवार म्हणाले ,” महाविकास आघाडी म्हणून राज्याच्या सगळ्या विभागात सभा घेणार आहोत. महाराष्ट्रावर संकट आल्यास मराठी माणूस पेटून उठतो. या भाषणानंतर कार्यकर्ते योग्य संदेश घेऊन जातील, यामध्ये शंका नाही .
महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर असताना महाविकास आघडीची सभा घेणार होतो, मात्र आधी कोरोना आणि नंतर काही घडामोडी घडल्या आणि सभा राहिली. महाविकास आघाडी आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि लोकसभा विधानसभा निवडणुकीत लढणार आहे.
सरकार पाडण्याचा केविलावणा प्रयत्न झाला. असे होत राहिल्यास तर स्थिरता राहणार नाही, ते राज्याला परवडणार नाही. उद्योगधंदे येणार नाही. प्रशासनाला विश्वास राहणार नाही त्यामुळे ते चांगलं काम करणार नाहीत. निवडणूक आयोगही असं निर्णय देत असल्यास कस होणार? न्यायदेवता न्याय देईल, अशी भावना आहे.
अजित पवार म्हणाले की, मराठवाडा मुक्ती संग्रामासाठी मुख्यमंत्री13 मिनिटे देतात. एवढी उपेक्षा आजवर कोणत्याही मुख्यमंत्र्याने केली नसेल. तुम्ही सर्वसामान्यचे मुख्यमंत्री म्हणून सांगता आणि मराठवाड्याच्या जनतेचा अपमान करता. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले यांचा अपमान केला. त्यावेळी दातखील बसली होती का? त्यावेळी का गौरव यात्रा काढली नाही?
आम्हाला सर्व महापुरुष यांचा आदर आहे. आज दोन केंद्रीय मंत्री राज्य सरकारचे मंत्री गौरव यात्रा काढतात हा दुटप्पीपणा आहे. सर्वोच्च न्यायालयाने मत व्यक्त केले हे शक्तीहीन नपुंसक सरकार आहे. सरकारला जनाची नाही तर मनाची वाटली पाहिजे. सावरकरांना भारतरत्न देण्याची आहे का हिंमत? अशी विचारणाही त्यांनी केली.
राज्यात उद्योग येणार होते, पण यांचा पायगुण चांगला नाही उद्योग सगळे निघून गेले. 75 हजार नोकर भरती होणार होते किती लोकांना दिली? कांदा अनुदान जाहीर केले पण अटी घातल्या. जाती धर्मात भेदभाव केला जात आहे. आज गौरव यात्रा काढता, तुमच्यात धमक असले तर सावरकरांना भारतरत्न देऊन दाखवा. महागाई, बेरोजगारीवरून लक्ष हटविण्यासाठी घटना घडत आहेत.
- शिवराज पॅलेस ‘ बँक्वेट हाॅलचे सीता खंडू वायकर व खंडू आबाजी वायकर यांच्या हस्ते उद्घाटन
- महागाव येथे कालाष्टमी व श्री. काळभैरवनाथ जयंती निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन
- इंदोरीत शनिवार दि.२३ नोव्हेंबरला समाजप्रबोधनकार ह.भ.प.निवृत्ती महाराज देशमुख यांचे किर्तन
- रविवार, २४ नोव्हेंबर रोजी गझलपुष्पचा वर्धापनदिन सोहळा : रविंद्र भेगडे यांच्या हस्ते होणार उद्घाटन
- संपतराव पांडुरंग गराडे यांचे निधन