गिरीश बापट यांच्या सवगंडयांनी जागवल्या बालपणीच्या आठवणी
तळेगाव दाभाडे :
पुणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार गिरीश बापट  अनंतात विलीन झाले.तळेगाव शहरासह मावळ तालुक्याशी त्यांचे घनिष्ठ नातं राहिले. बापट यांच्या निधनानंतर त्यांच्या आठवणींना तळेगावकरांनी उजाळा दिला.

गिरीश बापट यांचा जन्म तळेगाव दाभाडे येथील इंदुरीकर वाड्यात झाला. नोकरी निमित्त गिरीश बापट यांचे वडील तळेगाव दाभाडे मध्ये स्थायिक झाले होते. दोन बंधू आणि एक बहीण असा चार भावंडांचा परिवार असणाऱ्या घरात गिरीश यांचा जन्म जन्म ३ सप्टेंबर १९५२ रोजी झाला.

बापट  ब्राह्मण समाजातील असून सुद्धा बहुजन समाजाला आपलासा वाटणारा नेता त्यांची ओळख असणाऱ्या गिरीश बापट यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्राथमिक धडे बनेश्वर शाखेमध्ये भाऊ अग्रेसर यांच्याकडून मिळाले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघटनेचे उत्तम करत संघटन कौशल्य सादर बापट यांनी अल्पावधीतच लोकप्रियता कमावली होती.

बापट राहत असलेल्या वाड्यासमोरील चाफेकर वाडा येथील महादेव रामचंद्र चाफेकर यांनी बापट यांना पुण्यामधील घर पाहून दिले होते. मनमिळावू स्वभावाचा व संयमी असा गिरीश आता आपल्यामध्ये नाही हे समजतात चाफेकर भावूक  झाले. त्यांनी गिरीश बापट यांच्या आठवणींना उजाळा दिला.

गिरीश बापट यांच्याबरोबर एकत्र शिक्षण घेणारे सुरेश वाबळे यांनी आठवणींना उजाळा देताना  शालेय शिक्षणामध्ये बाबा, देशमुख गुरुजी, कांगो शिंपी गुरुजी, खंडागळे बाईनी आम्हाला घडवले, शिकवले असे सांगितले. संध्याकाळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बनेश्वर शाखेत खेळ शिक्षण व शाखा अभ्यासक्रम पूर्ण करून बापट यांच्या वाड्यातच अभ्यासाला आम्ही मित्र एकत्र जमत असू .

माधव जोशी, सुरेश नाखरे, रत्नाकर देशमुख, सुधाकर खांबेटे, वसंत भेगडे पाटील, चंद्रकांत शेटे, किसन भेगडे, पोपट भेगडे यांनी आठवणी सांगितल्या.

मूळच्या मराठवाड्यातील रहिवासी असणारे गिरीश बापट यांचे वडील भालचंद्र हे नोकरी निमित्त मध्य प्रदेशातील पुलगाव ( सध्याच्या विदर्भातील ) ऑर्डिनन्स फॅक्टरी कामाला होते तेथून बदली झाल्यानंतर तळेगाव दाभाडे येथील ऑर्डिनन्स फॅक्टरीमध्ये ते आले. तळेगाव येथील शुक्रवार पेठेतील इंदुरीकर वाड्यात बापट कुटुंब स्थायिक झाले.

error: Content is protected !!