वडगाव मावळ:
टाकवे बुद्रुक विविध कार्यकारी सेवा संस्थेच्या अध्यक्षपदी योगेश गायकवाड व उपाध्यक्ष पदी सदाशिव जांभुळकर यांची बिनविरोध निवड झाली. रिक्त झालेल्या जागेसाठी निवडणूक घेण्यात आली होती.
मावळते अध्यक्ष पांडुरंग मोढवे व उपाध्यक्ष जितेंद्र परदेशी यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिल्यामुळे या दोन्ही जागा रिक्त झाल्या होत्या. अध्यक्ष पदासाठी योगेश बबन गायकवाड व उपाध्यक्ष पदासाठी सदाशिव मच्छिंद्र जांभुळकर या दोघांचे एक एक अर्ज दाखल झाल्याने निवडणूक बिनविरोध झाली.
निवडणूक अधिकारी पी. बी. खोतकर व सहाय्यक म्हणून मदन अडिवळे यांनी काम पाहिले.यावेळी संचालक शिवाजी असवले, सुलाबाई असवले, सुप्रिया मालपोटे, दत्तात्रेय असवले, विकास असवले,विलास मालपोटे, जालिंदर मालपोटे, तानाजी गुनाट तसेच ग्रामपंचायत सदस्य सोमनाथ असवले, विश्वनाथ असवले, राष्ट्रवादीचे तालुका उपाध्यक्ष मारुती असवले, माजी उपसरपंच स्वामी जगताप, दिलीप आंबेकर,दत्तात्रय मालपोटे, उद्योजक सचिन असवले, श्रीकांत मोढवे, टाकवे बुद्रुक व्यापारी संघटना माजी अध्यक्ष योगेश मोढवे, शालेय शिक्षण समिती अध्यक्ष अनिल असवले,
दत्ता गायकवाड, दिनेश असवले, किरण गायकवाड, पिंटू गायकवाड यांसह अन्य कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.
नवनिर्वाचित अध्यक्ष योगेश गायकवाड म्हणाले,” बिनविरोध निवड करून देणा-या सर्व संचालक मंडळाचे व ग्रामस्थ व सभासदांचे आभार. संस्थेच्या वतीने दिल्या जाणा-या कर्जातून शेतक-यांनी शेतीपूरक व्यवसायाला प्राधान्य द्यावे.