मुंबई:
भामा- आसखेड धरणग्रस्त आंदोलक शेतक-यांची शिवसेना उपनेते सचिन अहिर यांनी भेट घेतली. भामा-आसखेड धरणग्रस्त शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहीजे.. यासाठी दिनांक २३/३/२०२३ पासून धरणग्रस्त शेतकरी व त्यांचे कुटुंबियांनी आझाद मैदान मुंबई येथे बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे.

सरकार व संबधित अधिकारी यांचे कडून अद्याप पर्यंत प्रकल्पग्रस्त शेतकरी यांची म्हणावी तशी दखल घेतली गेली नाही. शासकीय अधिकारी फक्त आश्वासन देत आहेत .आमचा शासकीय अधिकारी त्यांचे आश्वासनावर विश्वास नाही. अशी आश्वासने गेली चार वर्ष ते धरणग्रस्तांना देत आहेत. त्या मुळे त्यांच्या आश्वासनाला काही किंम्मत नाही जो पर्यंत पर्यायी जमिन देऊन ७/१२ संबधीत धरणग्रस्त शेतकरी यांचे नावावर होत नाही तो पर्यंत हे आंदोलन चालू राहील असा इशारा अंदोलनकर्त्यांनी दिला.

जर सरकार या आंदोलनाची दखल घेणार नसेल तर हे  आंदोलन अजुन तीव्र केले जाईल. वेळ प्रसंगी मंत्रालया घूसून आंदोलन केले जावू शकते ? आंदोलन तिव्र झाल्या नंतर त्यातुंन काही अघटित घडले तर त्यास आंदोलक नाही तर सरकार जबाबदार असेल ? असा इशाराही अंदोलकांनी दिला आहे.

सरकारने भामा-आसखेड धरणग्रस्त शेतक-यांचे
प्रश्न तातडीने सोडवावे. अशी मागणी सत्यवान नवले यांनी केली. या वेळी माजीपंचायत समिती सदस्य चांगदेव शिवेकर, माजी पंचायत समिती सदस्य बन्सूशेठ होले , मुंबई डबेवाला असोशिएशन” चे अध्यक्ष सुभाष तळेकर, देवदास बांदल, सह शेकडो प्रकल्पग्रस्त शेतकरी उपस्थित होते. शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे उपनेते सचिनभाऊ अहीर यांनी आंदोलन शेतकर्यांची आझाद मैदानात भेट घेतली व आंदोलकांचे प्रश्न शासन दरबारी मांडून त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करीन असे आश्वासन आहार यांनी  शेतकऱ्यांना  दिले.

error: Content is protected !!