भायखळ्यात गुढीपाडवा शोभायात्रा उत्साहात
भायखळा:
मंदार निकेतन उत्सव मंडळाच्या वतीने भायखळ्यात गुढीपाडवा शोभायात्रा काढण्यात आली. आई एकवीरा देवीचा पालखी सोहळा असलेल्या या शोभायात्रेत नागरिकांनी उत्साहाने सहभाग घेतला.

शोभायात्रा सकाळी साधारणता ११ वाजता मंदार निकेतन इमारतीच्या पटांगणा पासुन सुरू होऊन दुपार २ वाजे पर्यंत चालली  होती. ही  शोभायात्रा भायखळा स्टेशन (प) पासून ना. म. जोशी मार्गाने मॅनेजमेन्ट गुरू कै.गंगाराम तळेकर चौकातून कॅा. गणाचार्य चौकात आली (चिंचपोकळी-प) येथुन पुन्हा ती आल्या मार्गाने माघारी आली व भायखळा स्टेशन (प) येथे संमाप्त झाली.

शोभायात्रा पाहण्यासाठी गिरणगावातील लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते.या वर्षी शोभा यात्रेचे आकर्षण “ आई एकवीरा” पालखी सोहळा आयोजीत केला आहे.  या शोभायात्रेत पुरूष मंडळी मराठमोळी पारंपारिक वेशभूषा केली होती तर महिला नऊवारी साड्या नेसून, फेटे बांधून, नथ घालून सहभागी झाल्या होत्या.

शोभायात्रात शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे  उपनेते  नगरसेवक मनोज जामसुतकर , नगरसेविका वंदना गवळी,  नगरसेविका गिता गवळी ,समाजसेवक रोहीदास लोखंडे ,सुभाष गंगाराम तळेकर अध्यक्ष मंदार निकेतन उत्सव मंडळ, गीता गवळी, वंदना गवळी यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

error: Content is protected !!