कामशेत:
श्रीक्षेत्र गोवित्री साबळेवाडी येथे जगद्गुरू श्री.संत तुकाराम महाराज पादुका प्रतिष्ठान (ट्रस्ट)च्या वतीने श्रीसंत तुकाराम महाराज बीज उत्सव सोहळा उत्साहात संपन्न झाला. पंचक्रोशीतील भाविकांनी या सोहळ्यात भक्तीचे सोनं लुटलं. तुकाराम तुकाराम नामाच्या जयघोषाने पादुका स्थळ दुमदुमून गेले होते.

पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे संचालक बाळासाहेब नेवाळे यांनी पस्तीस गावांना एकत्रित करून स्थापन केलेल्या श्री.संत तुकाराम महाराज पादुका प्रतिष्ठान (ट्रस्ट)च्या वतीने येथे दरवर्षी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. याही वर्षी श्रीसंत तुकाराम महाराज बीज उत्सव सोहळा अधिक दमदार पणे साजरा करण्यात आला.
शांतीब्रम्ह संत एकनाथ महाराज यांचे वंशज  ह.भ.प. योगिराज महाराज गोसावी (पैठण),ह.भ.प. माऊली महाराज कदम (छोटे माऊली) (आळंदी)ह.म.प. महादेव महाराज राऊत (बीड) यांची किर्तन झाली.  थोर समाजसेवक प्रबोधनकार ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर) यांचेतुकाराम बीजेच्या दिवशी वैकुंठ गमनाचे किर्तन झाले.

गुरुवर्य ह.भ.प. अर्जुनसिंग महाराज परदेशी (बाबा) (नगर) यांच्या काल्याच्या किर्तनाने या सोहळ्याची सांगता झाली. ग्रामीण भागातील भजन मंडळाच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सुमारे शंभर  भजन मंडळानी या स्पर्धेत सहभाग घेतला. विजेत्या स्पर्धकांना रोख रक्कमेची बक्षीसे देऊन गौरविण्यात आले.

महिला आणि बाल भजन मंडळाचा सहभाग वाखण्या सारखा होता. उद्घाटन सोहळ्यास खासदार श्रीरंग बारणे,खटाव माणगांवचे आमदार महेश शिंदे, पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे संचालक बाळासाहेब नेवाळे,जनसेवा विकास समितीचे अध्यक्ष किशोर आवारे, जिल्हा परिषद समाज कल्याणचे माजी  सभापती अतिष परदेशी, विष्णुपंत नेवाळे,माजी उपसभापती दत्तात्रय शेवाळे, सरपंच योगेश केदारी उपस्थित होते. सांगता सोहळ्यास माजी राज्यमंत्री बाळा भेगडे,माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर,माजी उपसभापती शांताराम कदम यांच्या अन्य मान्यवर उपस्थित होते. अतुल सातकर,बाबाजी काटकर,मनोहर ढमाले,देवराम मोकाशी,गोविंद पिंगळे यांनी सुत्रसंचालन केले.

मुंढावरे, वडिवळे, वळक बुधवडी, सांगिसे, वेल्हवळी, नेसावे, खांडशी, उंबरवाडी, कोळवाडी, वळवंती, जांभवली, थोरण, शिरदे, सोमवडी, भाजगाव, वडवली साबळेवाडी, करंजगाव गावठाण, ब्राम्हणवाडी, गाडेवाडी, मोरमारेवाडी, कांब्रे, कोंडीवडे ना.मा. नाणे, नविन उकसान, नाणोली, साई, वाऊंड, कचरेवाडी, देशमुखवाडी, घोणशेत, गोवित्री, पाले ना.मा. उकसान, ग्रुप ग्रामपंचायत चिखलसे गावातील भजनी मंडळाचे हरिजागर झाले. अन्नदान करण्यात आले.

error: Content is protected !!