मुंबई:
मुंबई डबेवाल्यांच्या नाव लौकिकाची  ख्याती साता समुद्रापार पोहचली आहेच.ऑस्ट्रेलियन पंतप्रधान अँथनी  अल्बनीस यांनी  मुंबई डबेवाल्यांची भेट घेतली. आणि डबेवाल्यांच्या मॅनेजमेंट बाबत समजून घेतले.

चार दिवसांच्या भारत दौऱ्यावर असलेल्या ऑस्ट्रेलियन पंतप्रधान अँथनी अल्बनीस यांनी मुंबई भेटी दरम्यान  ज्यांच्या नियोजन प्रणाली ने जगाला भुरळ घातली त्या मुबईच्या डबेवाल्यांना ताज हॉटेल मध्ये भेट घेऊन त्यांना स्वतः च्या हाताने जेवण बनवत डब्यांमध्ये भरून देत सन्मानित करत डबेवाल्यांशी संवाद साधला .

  या ऐतिहासिक भेटीदरम्यान भारत ऑस्ट्रेलिया यांच्यात व्यापार , सुरक्षा आणि दोन्ही देशांमधील अंतर्गत संबंध सुधारण्यासाठी ऑस्ट्रेलियन पंतप्रधान आणि त्यांचे शिष्टमंडळ चार दिवसाच्या भारत दौऱ्यावर आलेले आहेत . या दरम्यान मुंबईत आल्यावर पंतप्रधान अँथनी  अल्बनीस यांनी डबेवाल्यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती ती आज पूर्ण झाली .
 
    या अविस्मरणीय भेटी दरम्यान   केंद्र सरकारच्या वतीने  रेल्वेमंत्री श्री पियुष गोयल यांचे सह मुंबई डबेवाला संघटनेचे अध्यक्ष रामदास करवंदे व इतर  डबेवाले शिष्टमंडळात सहभागी होते.

error: Content is protected !!