टाकवे बुद्रुक:
टाकवे नाणे जिल्हा परिषद गट भाजपा अध्यक्ष रोहिदास असवले यांच्या वतीने मावळ तालुका व आंदर मावळचे शेवटचे टोक कळकराई येथे पाहणी दौरा करण्यात आला.
मावळ तालुका पुणे जिल्हा व आंदर मावळचे शेवटचे टोक कळकराई या भागामध्ये 45 कुटुंब अनेक सुविधांपासून वंचित आहे. त्या अनुषंगाने भेट देण्यात आली येथील जुन्या पिढीतील जाणकार नागरिकांना व युवकांना भेटी देऊन या भागातील समस्या माजी उपसरपंच रोहिदास असवले यांनी जाणून घेतल्या.
कळकराईच्या प्रमुख्याने समस्या या आहेत,रायगड जिल्हा कर्जत मार्गे या गावांमध्ये रस्ता होणे अपेक्षित आहे.
गावापर्यंत पूर्ण रस्ता झाला तर गावामध्ये अनेक सुख सुविधा उपलब्ध होतील. रस्ता नसल्यामुळे या भागात चार चाकी गाडी येत नाही त्यामुळे कोणत्याही सुविधा होत नाहीत.
ह्या अनुषंगाने टाकवे नाणे जिल्हा परिषद भाजपा अध्यक्ष रोहिदास असवले यांच्या वतीने रस्ता होण्यासाठी प्रयत्न करणार असे आश्वासन देण्यात आले आहे. आमदार सुनील शेळके यांच्या माध्यमातून रस्ता मंजूर करण्यात आलेला आहे. तो रस्ता पूर्ण झाल्यानंतर तिथून पुढे त्या रस्त्यासाठी आवश्यक लागणारी मदत पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील, माजी मंत्री बाळा भेगडे यांच्या माध्यमातून पाठपुरावा करून कळकराई गावापर्यंत रस्ता पोहोचवण्याचे काम करण्यात येणार असल्याचे असवले यांनी यावेळी सांगितले.
यावेळी येथील नागरिकांनी विनवणी केली आहे काही करून गावापर्यंत रस्ता झालाच पाहिजे रस्ता झाला तर उद्या आमच्या मुला बाळांची लग्न होण्यास मदत होईल आम्हाला अनेक सुविधा उपलब्ध होतील. रस्त्याचा आमचा अनेक वर्षापासून विषय आहे हा रस्ता झाला पाहिजे अशी मागणी नागरिकांनीची मागणी आहे. त्यासाठी माजी उपसरपंच रोहिदास असवले तुम्ही नक्की प्रयत्न करणार अशी नागरिकांनी अपेक्षा व्यक्त केली आहे.