मुंबई:
पर्यावरण पुरक होळी करणे  काळाची गरज आहे.
मुंबईच्या पर्यावरणाचा दर्जा आधीच खुप घसरला आहे. मुंबई रात्र-दिवस धुरक्यात हरवली आहे. या धुरक्यामुळे मुंबईकरांना श्वसनाचे आजार जडले आहेत. त्यात आली होळी !
मुंबईत जवळ जवळ प्रत्येक ईमारतीची, वस्तीची, आप आपली स्वताची स्वतंत्र होळी असते.

त्यामुळे होळी पौर्णिमेला मुंबईत हजारो होळ्या पेटतात. आधीच मुंबईत धुरके आहे त्यात अजून होळीच्या धूराची भर पडणार आहे. त्या मुळे येणाऱ्या दोन दिवसात मुंबईच्या पर्यावरणाचा स्तर खुपच खालावणार आहे. त्या मुळे मुंबईकरांना श्वसनाच्या विविध आजारांना सामोरे जावे लागणार आहे.

“मुंबई डबेवाला असोशिएशन” यांचे वतिने नागरिकांना आवाहन करण्यात येते की, होळी आणि धुलीवंदन हे दोन सण साजरे करताना पर्यावरणपूरक विचार जोपासून प्रदूषण कमी कसे करता येईल या अनुशंगाने हे सण साजरे केले पाहीजेत.
आपली परंपरा नक्की जपा, पण परंपरा जपत असताना पर्यावरण पुरक होळी नक्की बांधा, होळीसाठी वृक्षतोड करू नका.

मुंबई डबेवाला असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष तळेकर म्हणाले,”
शक्यतो टाकाऊ पदार्थांची होळी करा. रंगपंचमी साजरी करताना रासायनिक रंग वापरू नका, प्लास्टिक पिशव्या आणि पर्यावरणास हानिकारक गोष्टींचा उपयोग न करता हे सण साजरे करा. शक्य तितक्या सुक्या आणि इकोफ्रेंडली रंगांनी होळी खेळा. दिवसेंदिवस होणारी पर्यावरणाची हानी लक्षात घेता आपले सर्व सण पर्यावरणपूरक असायला हवेत. सोबतच पाण्याचा जपून वापर करणे गरजेचे आहे. होळी साजरी करताना आनंद घ्या; पण पाण्याचा अपव्यय टाळा.

error: Content is protected !!