दरकवाडी:
येथील श्री.जाखोबा महाराजांचा यात्रा उत्सव व अखंड हरिनाम सप्ताह उत्साहात साजरा करण्यात येणार आहे,श्री. जाखोबा महाराजांच्या उत्सवानिमित्त बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे. अखंड हरिनाम सप्ताह व उत्सवानिमित्त भाविकांनी तसेच बैलगाडा मालक,शौकीन यांनी उपस्थित रहावे असे आवाहन ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.

सोमवार दि. ०६/०३/२०२३ ते सोमवार दि. १३/०३/२०२३) या कालावधीत अखंड हरिनाम सप्ताह संपन्न होणार आहे.
वै. इ.भ.प. देवकाबाबा सुपे व ह.भ.प. गजानन पाचंगे, वै. ह.भ.प. गोविंदबाबा बोन्हाडे, वै. ह.भ.प. मारुतीबाबा गुरव यांचे कृपाशिर्वादाने व ह.भ.प. गुरुवर्ष मणिलाल काका नाईकडे (रु), वै. ह.भ.प. रामभाऊबाबा पावडे यांच्या
मार्गदर्शनाखाली आणि वै. ह.भ.प. रामचंद्र महाराज सुपे यांच्या प्रेरणेने अखंड हरिनाम सप्ताह  चालत आलेला आहे.

सप्ताहात पहाटे ४ ते ६ काकडा भजन  सकाळी ७ ते १९ ज्ञानेश्वरी पारायण * दुपारी ३ ते ५ नियमाचे भजन  सायं. ६ ते ७ हरिपाठ   सायं. ७ ते ९ महाप्रसाद के रात्र ९ से १९ हरिकिर्तन के रात्री ९९ से ३ हरिजागर  असे धार्मिक कार्यक्रम होणार आहे. प्रत्येक दिवशी अन्नदान करण्यात येणार आहे.

गुरुवर्य ह.भ.प. मणिलालकाका नाईकडे यांच्या हस्ते विणापुजन करण्यात येणार आहे.  गुरुवार, दि. ०९/०३/२०२३ रोजी सकाळी १० ते १२ वा तुकाराम बीजेनिमीत्त ह. भ. प. ज्ञानेश्वर महाराज पावडे यांचे किर्तन होईल.

ह.भ.प. दत्ता महाराज माशेरे (कनेरसर),ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज दौंडकर, (शेलपिंपळगाव),ह.भ.प. किशोर महाराज बांगर (चिखलगांव),ह.भ.प. बाळशिराम महाराज मिंडे (कोहींडे),ह.भ.प. अनिकेत महाराज बांगर (आळंदी),ह.भ.प. भरत महाराज थोरात (राजगुरुनगर),ह.भ.प. पोपट महाराज राक्षे (वेळदरा) यांची कीर्तने होणार आहे.

श्री जाखोबा महाराजांचा  यांचा उत्सव फाल्गुन कृ.६ शके १९४४ सोमवार दि. १३/०३/२०२३ रोजी होईल.श्री  अभिषेक, महापूजा,छबिना,पालखी मिरवणूक होईल
सोमवारी दि.१३ला भव्य बैलगाडा शर्यती होतील.विजेत्यांना रोख रक्कम व अन्य बक्षीसे देण्यात येईल. फळीफोड गाडयास रोख इनाम देण्यात येईल.

error: Content is protected !!