तळेगाव दाभाडे:
भारतीय जनता पार्टी मावळ विधानसभा क्षेत्रातील कार्यकर्त्यांचा प्रशिक्षण तळेगाव दाभाडे येथे संपन्न झाला.

या प्रशिक्षण वर्गास प्रमुख मार्गदर्शक म्हणून आमदार श्रीकांत भारतीय,माजी राज्यमंत्री बाळा भेगडे,पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य शरद बुट्टे पाटील उपस्थित होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून भाजपा पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष जालिंदर कामठे उपस्थित होते.

यावेळी मावळ तालुक्यातील संघटनात्मक कार्याचा आढावा घेण्यात आला. आगामी काळात बूथ सशक्तीकरण अभियान अंतर्गत करावयाच्या अल्प विस्तारक योजने संदर्भात सविस्तर माहिती देऊन कार्यकर्त्यांना संबोधित करण्यात आले. आगामी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मावळ मतदारसंघातून विधानसभेवर भारतीय जनता पार्टीचा विजयी झेंडा फडकवण्याचा संकल्प भाजपाच्या कार्यकर्त्यांनी केला.

शरद बट्टे पाटील यांनी केंद्र शासन व राज्य शासनाच्या जनकल्याण कारी योजना जनतेपर्यंत कशा पद्धतीने पोहोच होतील व बूथ स्तरावर त्याची घरोघरी अंमलबजावणी कशा पध्दतीने करावी यासंदर्भात सविस्तर मार्गदर्शन केले.

तसेच आमदार श्रीकांत भारतीय यांनी बूथ सशक्तीकरण अभियान अंतर्गत बूथ अध्यक्ष,शक्ती केंद्र प्रमुख,बूथ विस्तारक यांनी बूथ स्तरावर संघटनात्मक कार्य कशा पद्धतीने वाढवता येईल, प्रत्येक बूथ वर मतदानाची टक्केवारी कशी वाढवता येईल यासंदर्भात सविस्तर मार्गदर्शन केले.

माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी आगामी काळातील स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक म्हणजे विधानसभेची रंगीत तालीम असते यासाठी आगामी काळात होणाऱ्या सर्व निवडणुका जिंकण्यासाठी कार्यकर्त्यांनी कार्य करावे असे  आवाहन केले. आभार प्रदर्शन तळेगाव शहराचे अध्यक्ष रविंद्र माने यांनी केले.

यावेळी पश्चिम महाराष्ट्र भाजप अध्यक्ष जालिंदर कामठे, तालुकाध्यक्ष रविंद्र भेगडे,महिला आघाडी अध्यक्षा सायली बोत्रे यांच्या सह तालुक्यातील भारतीय जनता पार्टीचे सर्व प्रमुख आजी-माजी पदाधिकारी,मंडल प्रमुख,सर्व शक्तिकेंद्र प्रमुख,बुथप्रमुख, कार्यकर्ते बंधू-भगिनी उपस्थित होते.

error: Content is protected !!