वडगाव मावळ:मोरया महिला प्रतिष्ठान च्या माध्यमातून गेल्या वर्षभरात वडगाव शहरातील 68 कुटुंबांना घरपोहोच निःशुल्क रेशन कार्ड काढून देण्याचा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला.
सामाजिक बांधिलकी जपत शहरातील रहिवाशांसाठी “मदत नव्हे कर्तव्य” या सहकार्याच्या भावनेतून वडगाव मधील सर्व शेवटच्या घटकांपर्यंत अत्यावश्यक असलेल्या सोई सुविधा मिळाव्यात या भावनेतून नगराध्यक्ष मयूर ढोरे जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून शहरातील नागरिकांना रेशनकार्ड, आधारकार्ड, संजय गांधी अपंग पेन्शन योजना, विधवा पेन्शन योजना, श्रावणबाळ राज्यनिवृत्ती योजना, उत्पन्न दाखला, रहिवाशी दाखला तसेच मतदान ओळखपत्र व इतर अन्य सेवा सुविधांची माहिती व पाठपुरावा करून अनेक नागरिकांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले जातात.
शहरातील गोरगरीब गरजू जनतेला रेशन कार्ड मिळविण्यासाठी खूप खस्ता खाव्या लागतात, तर काही कुटुंबियांना तब्बल तीन-तीन महिने रेशन कार्ड मिळत नसल्याने नागरिक त्रस्त होतात. नागरिकांना होणारा नाहक त्रास आणि शासकीय कामाला लागणारा वेळ कमी करण्यासाठी मोरया महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्षा अबोली ढोरे या जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून स्वतः वैयक्तिक देखरेखी खाली शहरातील अनेक कुटुंबांना रेशन कार्ड काढून देण्यासाठी अग्रेसर असतात आणि त्याचा पाठपुरावाही त्या स्वता जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून जातीने लक्ष ठेवून करत असतात.
जर कोणाला रेशन कार्ड संदर्भात काही माहिती किंवा काही समस्या असल्यास जनसंपर्क कार्यालयास भेट द्यावी असे आवाहान अबोली ढोरे यांनी केले आहे.
- मंगळवार, १२ नोव्हेंबर रोजी संत नामदेवमहाराज जयंती सोहळ्याचे आयोजन
- मावळ मनसेचा बापूसाहेब भेगडे यांना पाठिंबा
- धनगर बांधवांचा अपमान केल्याप्रकरणी सुनील शेळके यांच्याविरोधात तक्रार दाखल करणार – बापूसाहेब भेगडे
- जनतेकडून मिळणारा प्रचंड प्रतिसाद पाहून विरोधकांकडून ‘रडीचा डाव’ – सुनिल शेळके
- रोबोटिक्स कार्यशाळेने विद्यार्थ्यांना दिले तंत्रज्ञानाचे धडे