कान्हेवाडी तर्फे चाकण:
   आदर्श ग्राम कान्हेवाडी तर्फे चाकण (ता.खेड)चे
आदर्श सरपंच भाऊसाहेब पवार यांनी आपल्या वडिलांचे
अंत्यविधी नंतर करण्यात येणारे रक्षा विसर्जन इंद्रायणी
नदी पात्रात न करता या  रक्षेचे खत वापरून वृक्षारोपण केले. पवार यांनी देशी वृक्ष लावून त्यांच्या संवर्धनाची प्रतिज्ञा केली. वडीलांच्या स्मृतीचे जतन करण्यासाठी रक्षा नदी पात्रात विसर्जित न करता त्या जपल्या असल्याचे पवार म्हणाले.

सरपंच पवार यांचे वडील एकनाथ पवार यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. वडीलांच्या संस्कारांतून आम्ही घडलो. त्यांच्या संस्कार आणि शिकवणीतून समाजकार्याची आवड आहे. त्यांच्या आशीर्वादाने जनतेची सेवा करण्याची संधी मिळाली. वडिलांच्या प्रती असलेल्या श्रद्धेतूनच त्यांच्या स्मृतीचे जतन करण्याचा हा प्रयत्न असल्याच्या भावना सरपंच  पवार  यांनी  व्यक्त केल्या.

खरतर कान्हेवाडी तर्फे चाकण गावाने आतापर्यंत ग्राम स्वच्छता,सांडपाणी व्यवस्थापन,वृक्षारोपण व संवर्धन,घनकचरा  व्यवस्थापन,आरोग्य सुविधा,पिण्याचे पाणी व्यवस्था अशाविविध विकास कामांबाबत राज्य व राष्ट्रीय पातळीवरअनेक पुरस्कार पटकावून माॅडेल गावाचा दर्जा प्राप्त केला आहे.

गावाजवळून वाहणारी इंद्रायणी नदीचा प्रवाह स्वच्छ
ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहेच.परंतू अंत्यविधीचे
रक्षाविसर्जन नदी पात्रात करण्याची परंपरा थांबवणे कठीण आहे.कारण ही रूढी भावनिक आहे. नदीचे
पावित्र्य व स्वच्छता राखण्यासाठी नदीपात्रात रक्षाविसर्जन न करण्याची इच्छा  कृतीत आणण्यासाठी स्वत:चे
घरापासून सुरुवात केली.अशी प्रतिक्रिया सरपंच भाऊसाहेब पवार यांनी व्यक्त केली.

घरामधील चुलीतील राख आपण खत म्हणून शेतात टाकतच असतो.म्हणून गावांगावांमधून या उपक्रमाचे अनुकरण करावे.म्हणजे  नदीचे पाणी दुषित होणार नाही.व वृक्षांना खत मिळेल असे आवाहन पवार यांनी केले.
रक्षा विसर्जन विधीसाठी नातेवाईक,हितचिंतक,
भावकी,गावकी व परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने आले होते.

त्यांचे उपस्थितीत सरपंच भाऊसाहेब पवार,बंधू दत्तात्रय पवार,कैलास पवार तसेच संभाजी
पवार,शिवाजी पवार यांनी कै.एकनाथ पवार यांचे
स्मृतीप्रित्यर्थ स्मशान भूमी जवळच वड व पिंपळ या
देशी झाडांची लागवड केली.

व रक्षा विसर्जनाची राखसदर झाडांना खत म्हणून घातली. या वृक्षांचे संगोपनाचीजबाबदारी ही पवार कुटुंबियांनी घेतली आहे.अशाप्रकारे वृक्षारोपण व रक्षा विसर्जन उपक्रमाने वडिलांची स्मृती कायम राहाणार असल्याचे सांगितले.

error: Content is protected !!