तळेगाव दाभाडे:
  मराठी भाषेच्या समृद्धीसाठी प्रत्येक  मराठी भाषिकांनी मराठी भाषेतच बोलले पाहिजे तसेच वाचनही केले पाहिजे असे प्रतिपादन प्रा.सत्यजित  खांडगे यांनी केले. तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या  मराठी राजभाषा  दिनाच्या  कार्यक्रमात प्रा.खांडगे ह बोलत होते.
   कार्यक्रमाचे  आयोजन  मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक यांनी केले होते. तर यावेळी  व्यासपीठावर उपमुख्याधिकारी सुप्रिया शिंदे, तळेगाव दाभाडे शहर पत्रकार संघाचे सचिव  सोनबा गोपाळे   होते.  
  
     माझी वसुंधरा अभियानाचे अंतर्गत  यावेळी  वृक्ष वाटप  व
पर्यावरण  रक्षणाची  शपथ  घेण्यात आली.  तर उपमुख्याधिकारी सुप्रिया शिंदे यांनी आभार मानले.

कार्यक्रमास  विविध  खात्याचे वरिष्ठ अधिकारी  तसेच  कर्मचारी  उपस्थित होते .वरिष्ठ अधिकारी  रविंद्र काळोखे यांनी यांनी  कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.

error: Content is protected !!