श्री एकविरा देवस्थान ट्रस्ट विश्वस्त निवडणूक निकाल जाहीर
विश्वस्त  मंडळाच्या चार जागांसाठी झाली होती निवडणूक : तीन  जागा  झाल्या होत्या बिनविरोध
कार्ला-  : महाराष्ट्रातील जागृत देवस्थान व कोळी आगरी सीकेपी अशा विविध समाजातील नागरिकांची कुलस्वामिनी म्हणून ओळख असणाऱ्या वेहेरगाव येथील श्री एकविरा देवी च्या श्री एकविरा देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्त मंडळाची निवडणूक २६  फेब्रुवारी रोजी  घेण्यात आली.

विश्वस्त निवडणूकीसाठी शांततेत मतदान झाले.
देवस्थानचा कारभार पाहण्याकरिता कायमस्वरूपी विश्वस्त मंडळघटनेतील तरतुदीनुसार विश्वस्त मंडळाच्या काही जागा या पदसिद्ध असून काही जागा भाविक भक्तांमधून भरण्यात येतात. यापैकी पदसिद्ध असलेल्या जागेवर पुजारींमधून संजय गोविलकर यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध नियुक्ती करण्यात आली आहे.

गावच्या सरपंच या पदसिद्ध पदावर विद्यमान सरपंच अर्चना संदीप देवकर यांचा एकमवे अर्ज आला आहे. तर गुरव परिवाराच्या तीन पदसिद्ध जागांपैकी दगडू त्रिंबक देशमुख या तक्षिमेतील नवनाथ रामचंद्र देशमुख य‍ांचा एकमवे अर्ज आल्याने वरील तिन्ही जागा बिनविरोध झाल्या होत्या .

   गुरव परिवारातील उर्वरित दोन पदसिद्ध जागांपैकी नथु दगडू देशमुख या तक्षिमेतील महेंद्र अशोक देशमुख २२ मते मिळवत विजयी झाले  तर राघू त्रिंबक देशमुख व कोंडू बहिरु देशमुख या तक्षिमेतील जागेसाठी मारुती रामचंद्र देशमुख १०४ मते मिळवत  विजयी झाले.
  
स्थानिक गावातील भाविक या दोन जागांसाठी वेहेरगाव गावातून  २१ उमेदवार होते यामध्ये  सागर मोहन देवकर यांना ३३० मते तर विकास काशिनाथ पडवळ ३०९  हे दोघेजण विजयी झाले.

   निवडणूक अधिकारी एस.एस. पारच यांनी काम पाहिले तर निवडणूकांमध्ये कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी लोणावळा ग्रामीणचे पोलिस निरिक्षक किशोर धुमाळ यांंच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

error: Content is protected !!