संकल्प सोडण हे प्रत्येकालाच सोप असतं! पण संकल्प सिद्धीसाठी योग्य दिशा! योग्य सहकार्य आणि योग्य साधना असेल तर- तरच संकल्प सिद्धी होऊ शकते! चला तर त्या संदर्भात आपण  आणखी थोडं जाणून घेऊया—

मित्रांनो,  काही लोक आपलं उद्दिष्ट ठरवतात .पण ते  फक्त ठरवतात .त्याचं पुढं काहीच करत नाहीत साहजिकच उद्दिष्ट पूर्ण होऊ शकत नाही. त्यांना यासाठी त्याचं उत्तम उदाहरण द्यायचं म्हणजे  मला आंबा खायची इच्छा झालेली आहे . म्हणजेच  आंबा खाणं हे माझ मी उद्दिष्ट ठरवलेल आहे.

असं समजू या की त्यासाठी मी आंब्याच्या पानांवरती पाण्याची फवारणी करतो आहे. तर मला आंबा खायला मिळेल का? अर्थात या प्रश्नाच उत्तर निश्चितच नकारार्थी असेल. करण मी जर आंब्याच्या पानांवर पाणी मारलं तर त्याचा उपयोग होऊ शकणार नाही .

कारण  आंब्याचं पोषण होण्यासाठी त्या झाडाच मूळ ज्या ठिकणी आहे. त्या  ठिकाणीच मी पाणी घातल पाहिजे तरच त्यातून फळ निर्माण होईल ,आणि ते माझं आंबा खाण्याच उद्दिष्ट पूर्ण करील. म्हणूनच मित्रांनो आपण एकदा उद्दिष्ट ठरवल्यानंतर तीन गोष्टी आपल्याला करणे आवश्यक आहेत.

त्यात नंबर एक आपण नक्की कोणता प्रयत्न करायला हवा? दोन आपण कसे प्रयत्न करायला हवेत? आणि नंबर तीन ते प्रयत्न कोणत्या ठिकाणी करायला हवेत? या तीनही प्रश्नांचं महत्व एकदा नीट समजून घेतलं पाहिजे .  कारण जर हेच समजलं नाही तर पुढच्या कोणत्याही प्रयत्नांना उद्दिष्टांना आणि पर्यायाने स्वप्नांनाही काही अर्थ  उरणार नाही .

कारण प्रत्यक्ष आपल स्वप्न कधीच साकार होणार नाही असे मला वाटतं.
(शब्दांकन- ला. डॉ.शाळीग्राम भंडारी,तळेगाव दाभाडे)

error: Content is protected !!