वडगांव मावळ : मावळ ग्रामीण पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी विजय सुराणा तर उपाध्यक्ष पदी सचिन गोंविद ठाकर व विकास वाजे यांची निवड करण्यात आली आहे.बुधवार (दि.१५)रोजी वडगांव मावळ येथील पत्रकार संघाच्या कार्यालयात नुतन कार्यकारणी विषयावर चर्चाविनिमय होऊन नुतन कार्यकारणी जाहिर करण्यात आली आहे. मावळते अध्यक्ष भारत काळे यांनी आपला कार्यकाळ संपल्याने ठरल्याप्रमाणे काळे यांनी पदाचा राजीनामा दिला असल्याने वरिष्ठांनी राजिनामा स्विकारल्या नंतर नुतन कार्यकारणी जाहीर करण्यात आली आहे.यावेळी जेष्ठ पत्रकार ज्ञानेश्वर वाघमारे, गणेश विनोदे,सुदेश गिरमे, सचिन शिंदे, संकेत जगताप, केदार शिरसाठ, प्रसाद कुटे,अभिषेक बोडके,उत्तम ठाकर यांच्या सह आदी जण उपस्थितीत होते.

नुतनकार्यकारणी खालील प्रमाणे
अध्यक्ष विजय सुराणा
उपाध्यक्ष सचिन गोंविद ठाकर व विकास वाजे
सचिव ज्ञानेश्वर ठाकर सहसचिव योगेश घोडके
कायदेशीर सल्लागार किशोर ढोरे,
पत्रकार परिषद प्रमुख पदी निलेश ठाकर,
खजिनदार सुभाष भोते,
प्रकल्प प्रमुख चेतन वाघमारे,

यांच्या निवडी माजी अध्यक्ष भारत काळे यांनी जाहीर करण्यात केल्या यावेळी अनुमोदन जेष्ठ पत्रकार ज्ञानेश्वर वाघमारे यांनी केले.

error: Content is protected !!