वडगाव मावळ:
प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून जांभूळ सांगवी ग्रामपंचायत च्या वतीने रमाई आवास घरकुल योजना ९ घरे काम पुर्ण झाल्यामुळे गृहप्रवेश व ८ अ चा उतारा वाटप करण्यात आले व पंतप्रधान  घरकुल आवास योजना  १ घर पाया भुमिपुजन आणि लोकार्पण  सोहळा आयोजीत करण्यात आले होते.

त्यासाठी प्रमुख उपस्थिती श्री सुधीर भागवत  (गट विकास अधिकारी पंचायत समिती मावळ) श्री संताजी जाधव  ( कृषी अधिकारी पंचायत समिती मावळ) सौ शुभांगी भूमकर  (जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा विस्तार अधिकारी पं. स. मावळ) सौ प्रीती पारसकर  (अधीक्षक मावळ पंचायत समिती) तसेच जांभूळ गावचे लोक नियुक्त आदर्श सरपंच श्री नागेश ओव्हाळ, उपसरपंच श्री एकनाथ गाडे, व  मा. सरपंच संतोष जांभुळकर,ग्रा.पं. सदस्य श्री अमित ओव्हाळ,मा उपसरपंच व विद्यमान सदस्या सौ कुंदा खांदवे  विद्यमान सदस्य  सौ कल्पना काकरे ,सौ तृप्ती जांभुळकर, सौ स्नेहल ओव्हाळ,  सौ रुपाली गायकवाड, सौ रखाबाई भोईर,व  ग्रामसेवक   कल्याणी लोखंडे उपस्थित होते.

रमाई आवास घरकुल योजना व पंतप्रधान घरकुल आवास योजना या माध्यमातून लाभार्थ्यांना घर मिळाल्याबद्दल लाभार्थ्यांनी आनंद व समाधान व्यक्त करून पंचायत समिती मावळ व सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक व सदस्य यांनी सतत पाठपुरावा करून आम्हाला घरकुल मिळवून दिल्याबद्दल आभार मानले  तसेच जांभूळ सांगवी गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!