सोमाटणे:
    प्रजासत्ताक दिनानिमित्त ऊस तोड कामगारांसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र कासारसाई येथे  हीलींग हँड्स फाउंडेशन आणि एक दिवस समाजासाठी   ओजस हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने   मुळव्याध, बद्धकोष्ठता, हर्निया, भगंदर, व्हेरीकोस व्हेन्स व इतर पोटाचे विकारावर,अस्थीरोग जनरल फिजीशीयन तज्ञ डॉक्टरांच्या मदतीने मोफत तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते.
   
हिलींग हँडस फाउंडेशन डॉ अश्विनी परगेवार यांनी पेशंट तपासणी केल. आहार कसा असावा यावर त्यांनी मार्गदर्शन केले,आणि औषध वाटप  केले. आनंद मिसाळ यांचे सहकार्य लाभले. शिबिरात ५०  रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली.औषध वाटप करण्यात आले.

डॉ अजय मुंडे (फाउंडर एकदिवस समाज साठी),डॉ प्रकाश जाधवार,सुरज मुंडे,बबन बडे,कैलास धुणेओजस हॉस्पिटल तर्फे डॉ महेश कुदळे,डॉ चंद्रकांत पाटील, डॉ सुभाष जाधवार,डॉ अनिल बोराडे, उपस्थित होते.अनिता सैद (शिबीर व कार्यक्रम व्यवस्थापक)यांनी शिबिराचे पूर्ण नियोजन केले.

मधुरा भाटे  (संस्था समनव्यक) यांनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले.ड. अश्विन पोरवाल (अध्यक्ष, हीलिंग हॅण्डस फॉउंडेशन )डॉ. स्नेहल पोरवाल(सेक्रेटरी हींलिंग हॅन्डस
फाउंडेशन) यांचा आजारमुक्त समाज करण्याचा प्रयत्न आहे.

You missed

error: Content is protected !!