रेल्वेच्या धडकेत अनोळखी इसमाचा मृत्यू
तळेगाव दाभाडे :
मुंबई पुणे लोहमार्गावर कामशेत मळवलीच्या दरम्यान शनिवारी (दि.७) मालगाडीची धडक बसून एका अनोळखी इसमाचा मृत्यू झाला.

रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कामशेत मळवलीच्या दरम्यान किलोमीटर क्रमांक १३७/१८-२० जवळ मालगाडीची जोरदार धडक बसून डोक्याला झालेल्या गंभीर दुखापतीमुळे एका अनोळखी इसमाचा (अंदाजे वय ७५ वर्षे) मृत्यू झाला आहे.

हा इसम अंगाने सडपातळ, उंची सुमारे पाच फूट, रंगाने निमगोरा, उभट चेहऱ्याचा होता. याच्या अंगावर नेव्ही ब्लू रंगाचा हाफ स्वेटर, सफेद रंगाचा फुल बाह्यांचा शर्ट, काळा रंगाची नाईट पॅन्ट अंगावर होती. तरी या संदर्भात कोणाला माहिती मिळाल्यास रेल्वे पोलिसांसी संपर्क साधावा असे आवाहन पोलीस हवलदार शिवाजी सावंत यांनी केली आहे.

error: Content is protected !!