मावळ तालुका आरोग्य संघटनेने अध्यक्ष आनंद साबळे यांचे अपघाती निधन
तळेगाव स्टेशन:
टाकवे प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी व मावळ तालुका आरोग्य संघटनेने अध्यक्ष आनंद साबळे (वय ५०) यांचे अपघातात निधन झाले.
मंगळवार ता.८,ला सायंकाळच्या सुमारास साबळे कामावरून घरी जात असताना हा अपघात झाला. तळेगाव येथे सिंडीकेट बँक परिसरात  साडेपाचच्या सुमारास अपघात झाला होता.
साबळे यांना उपचारासाठी पवना हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते.
उपचारादरम्यान रात्री साडेआठच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.  साबळे टाकवे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत होते. सर्वाशी आदराने बोलणे आपुलकीने विचारपूस करणे वैद्यकीय महिती देण्यासाठी नेहमी सहकार्य करणारे डॉक्टर म्हणून ते परिचित होते.
आनंद साबळे यांचे निधन झाल्याने टाकवे बुद्रुक परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. बुधवारी टाकवे येथे दुपारी १२ वा अंत्यविधी होईल.

error: Content is protected !!