माळेगाव बुद्रुक: विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला वाव मिळावा म्हणून विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते  विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन संस्थेचे सचिव पोपटलाल बाफना यांचे हस्ते झाले. कार्यक्रमाचे अध्यक्ष पंचायत समीती चे माजी सभापती शंकरराव सुपे होते.

प्रदर्शनात शाळेतील बहुतांशी विद्यार्थ्यांनी सक्रीय सहभाग घेतला होता पर्यावरण,सेंद्रीय शेती,सोलर सिस्टम,माहिती संप्रेषण व तंत्रज्ञानातील प्रगती, पर्यावरणाला अनुकूल सामग्री, आरोग्य व स्वच्छता, वाहतूक व नवोपक्रम तसेच, पर्यावरणीय चिंता, आमच्यासाठी गणित असे प्रकल्प प्रदर्शनात असे अनेकानेक नवनवीन प्रकल्प प्रदर्शनात पहायला मिळाले.

शंतनु कांबळे, महेश्वरी पिंपरकर ,हितेश पिंपरकर… याचे प्रकल्पांची तालूका स्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड करण्यात आली आहे. शंकरराव सुपे ,जालींदर मेटल, दशरथ दगडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून वैयक्तीक बक्षीस ही दिले. मान्यवरांनी आपल्या भाषणात विद्यार्थी व विज्ञान अध्यापक संतोष बारसकर यांचे कौतुक केले.यावेळी भाऊसाहेब बोऱ्हाडे,काळूराम सुपे,सुनील माकर,मधूकर गंभीरे,शितल दंडवते, नागनाथ चामे,अनिल पिंपरकर आदी मान्यवर उपस्थित होते.

विज्ञान प्रदर्शन यशस्वी होण्यासाठी संतोष बारसकर यांचे बरोबर तुषार पवार, सुनिल गायकवाड,अशोक सुपे,बाळासाहेब गायकवाड,रघूनाथ सातकर यांनी सहकार्य केले.विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेश गायकवाड यांनी प्रास्ताविक केले नामदेव गाभणे यांनी सुत्र संचलन केले तर राजेंद्र भांड यांनी आभार मानले.

error: Content is protected !!