तळेगाव स्टेशन:
नवीन समर्थ विद्यालयामध्ये सावित्रीबाई फुले जयंती  साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष नवीन समर्थ विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय वंजारे  व  पर्यवेक्षक रेवाप्पा शितोळे ,ज्येष्ठ अध्यापिका कमल ढमढेरे, सविता चव्हाण यांच्यासह  मान्यवर मान्यवर उपस्थित होते.
मान्यवरांच्या शुभहस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले,कार्यक्रमासाठी इयत्ता सातवी अ व आठवी अ मधील विद्यार्थिनी साक्षी गायकवाड यांनी सावित्रीबाईंची वेशभूषा केलेली यावेळी विद्यालयातील अनेक विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली
   कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयातील इंग्रजी विषयाच्या अध्यापिका शारदा वाघमारे यांनी केले.
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले  यांचे कार्य काही विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले.  त्याचप्रमाणे सावित्रीबाईंची ओवी म्हणून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
विद्यालयातील विज्ञान विषयाच्या अध्यापिका वंदना मराठी यांनी सावित्रीबाईंचा जीवनपट विद्यार्थ्यांसमोर मांडला तसेच सविता चव्हाण यांनी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक संजय वंजारे यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून मुलींचे वर्तमान स्थितीत असणारे शिक्षणाचे महत्त्व स्पष्ट केले
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री रेवाप्पा शितोळे यांनी केले. हा कार्यक्रम अतिशय  उत्तमपणे करण्यासाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्रयत्न केले.

error: Content is protected !!