वेटलिफ्टिंग स्पर्धेत वडगावच्या खेळाडूंना यश
वडगाव मावळ:
कुडाळ येथे झालेल्या शालेय राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत वडगावच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली. क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य व जिल्हा क्रीडा अधिकारी सिंधदुर्ग यांनी राज्यस्तरीय शालेय १७ व १९ वर्ष मुलींच्या वेटलिफ्टिंग स्पर्धेचे आयोजन कुडाळ येथे केले होते. या स्पर्धेत १६० मुलींनी सहभाग नोंदवला. इंद्रायणी जिमच्या खेळाडू साक्षी रोहिदास म्हाळसकर हिने ६४ किलो वजन गटात १०६ किलो वजन उचलून रौप्य, तर सई अमोल शिंदे हिने ५९ किलो वजन गटात ९४ किलो वजन उचलून कांस्यपदक पटकावले. या दोन्ही खेळाडू शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त नितीन म्हाळसकर यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहेत.

error: Content is protected !!