



टाकवे बुद्रुक:
रोहिदास नाना असवले कोंडीवडे आयोजित कोंडिवडे प्रिमियर लीग2२०२२ला उत्साहात सुरूवात करण्यात आली.आंदर मावळातील कोंडीवडे क्रिकेट प्रीमियर लीगचे उद्घाटन टाकवे गावचे माजी उपसरपंच व टाकवे नाणे जिल्हा परिषद भाजपा गट अध्यक्ष रोहिदास असवले यांच्या हस्ते झाले.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व श्रीफळ वाढवून क्रिकेट लीगचे उद्घाटन करण्यात आले. त्यांच्यासमवेत माजी ग्रामपंचायत सदस्य रोहिदास जांभुळकर व तसेच क्रिकेट लीग मध्ये सहभागी झालेले संघाचे खेळाडू उपस्थित होते.
माजी उपसरपंच रोहीदास असवले म्हणाले,”नवोदित खेळाडूंना प्रेरणा आणि प्रोत्साहन देण्यासाठी या लीगचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व खेळाडूंनी या स्पर्धेत आपले कौशल्य पणाला लावावे.
तर आंदर मावळ आणि नाणे मावळातील क्रिकेट प्रेमी आणि क्रिकेट शौकिनांनी या स्पर्धेस उपस्थित राहून नवोदित खेळाडूंचे कौतुक करावे.