
साई- वाऊंड विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमनपदी आकाश पिंगळे यांची बिनविरोध निवड
टाकवे बुद्रुक:
साई विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमनपदी आकाश पिगंळे व व्हाईस चेअरमनपदी बंडू सोनवणे यांची बिनविरोध निवड करण्यात आली .
बाळासाहेब मोकाशी व सुभाष जाधव यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या पदासाठी निवडणूक घेण्यात आली
प्रत्येकी जागेसाठी एक-एक अर्ज दाखल झाल्याने निवडणूक बिनविरोध झाल्याचे निवडणूक आधिकारी पी.व्हि.कोतकर यांनी जाहीर केले
संचालक सुरेश गरुड, बबन जाधव, बंडु कचरे,बाळकृष्ण मोकाशी, भाऊ कचरे, बाबु शेडगे, मिनाबाई पिगंळे, माणिक गरुड, फसाबाई थरकुडे आदी संचालक उपस्थिती राहुल नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या.
नवीन कायद्यात अनेक मोठे बदल राज्य सरकारने केल्यामुळे सोसायट्यांना अधिकचे अधिकार मिळाले आहेत, सर्वांना बरोबर घेऊन सोसायटी अव्व्ल करण्याचा मानस असल्याचे नवनिर्वाचित चेअरमन आकाश पिंगळे यांनी निवडीदरम्यान बोलताना सांगितले.
- वडगाव मावळच्या न्यू इंग्लिश स्कूलचा एनएमएमएस परीक्षेचा धडाकेबाज निकाल
- नूतन महाराष्ट्र अभियांत्रिकीचे प्रा. शाहुराज साबळे यांना डॉक्टरेट
- कामशेत येथे महिला कार्यगौरव सोहळा संपन्न
- रमजान ईद निमित्त इंदोरीत खजूर वाटप : प्रशांत भागवत युवा मंचाचा उपक्रम
- संत तुकाराम साखर कारखान्याच्या माध्यमातून तालुक्याचा सर्वांगीण विकास व्हावा – आमदार सुनील शेळके



