निगडे:
निगडे गावातील सर्व ग्रामस्थ मंडळींना माझा सप्रेम नमस्कार! आज मला सरपंच पदी विराजमान होऊन पाच वर्षे पूर्ण झाली. माझा सरपंच पदाचा कार्यकाळ आज पूर्ण होत आहे.हा क्षण कदाचित माझ्यासाठी खूप भावनिक आहे. परंतू या पाच वर्षांच्या कालावधीत आपण सर्वानी जो विश्वास टाकला या बद्दल मी आपल्या सर्वाची ऋणी आहे.पदा पेक्षा माझ्या मातीतील जनतेची सेवा करण्याचे भाग्य मला मिळाले याचा मोठा आनंद आणि समाधान देखील आहे,निगडे ग्रामपंचायतीच्या प्रथम लोकनियुक्त सरपंच सविता बबुशा भांगरे यांची ही भावनिक साद निगडे गावातील महिला, पुरूष, वडीलधारी मंडळी, तरूण आणि विद्यार्थ्यांना आहे.
पाच वर्षापूर्वी निगडे ग्रामपंचायतींच्या प्रथम लोकनियुक्त सरपंच पदी विराजमान झालेल्या सरपंच सविता भांगरे यांनी गावक-यांचे आभार मानीत मनातील भावना शब्द रूपाने वाट मोकळी करून दिली 
आपल्या भावना व्यक्त करताना सविता भांगरे म्हणाल्या,” चूल आणि मूल या विश्वातील असणारी महिला या पदावर विराजमान झाल्यानंतर मला खऱ्या अर्थाने समजले की ग्रामपंचायत सरपंचाला लोकसेवक या नात्याने गावातील सर्व जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात. गावाला समृद्ध करून विकासाच्या पथावर घेऊन जाण्याची जबाबदारी सरपंचावर असते.
त्यानुसार शासनाने सरपंचाला इतर पदाधिकाऱ्यापेक्षा विशिष्ट अधिकार प्रदान केले आहेत. आणि त्या अधिकारांसोबत गाव विकासाच्या दृष्टीने सरपंचाची कर्तव्य व जबाबदारीचा भारही शासनाने त्यांच्यावर सोपवला आहे. त्याचप्रमाणे तो ग्रामपंचायतीचा कार्यकारी प्रमुख म्हणून जबाबदारी पार पाडत असतो .
पण हे बोलण्यामागचा उद्देश इतकाच आहे, माझ्या गावातील सर्व जनता ज्यांनी मला देश व राज्यपातळीवर ओळख निर्माण करून दिली .माझ्या  प्रत्येक कार्यात सर्वांचे लाखमोलाचे मार्गदर्शन मिळाले, अन  साथही  मिळाली. आपण सर्व जण सोबतीला होते,  म्हणून हे सर्व शक्य झाले. माझा हा  पाच वर्षांचा कार्यकाळ आपण सर्वजणांच्या मदतीने कसा निघून गेला कळलं सुद्धा नाही.
आपले हे सुंदर गाव मी आमचे सर्व ग्रामपंचायत  सदस्य यांनी घरासारखे जपले याची सजावट जीव ओतून केली, आणि ती जपली सुद्धा. शेवटच्या क्षणापर्यंत आता यापुढे आपले गाव  खूप खूप यशस्वी होण्यासाठी सर्वजण एकोप्याने एकत्र येतील आणि अशीच मदत करतील हअपेक्षा वाटते.
  कळत  नकळत काही अनावधानाने चुकलं असेल तरी मनापासून मोठ्या मनाने माफ कराल अशी अशा बाळगते.विशेषता ग्रामपंचायतचे कर्मचारी  व अधिकारी वर्ग यांचे मानावे तितके आभार व धन्यवाद.
  आपली सौ.सविताताई बबुशा भांगरे,  प्रथम लोकनियुक्त सरपंच  ग्रामपंचायत निगडे मावळ.

error: Content is protected !!