वडगाव मावळ:
माजी मंत्री बाळा भेगडे यांच्या माध्यमातून जिल्हा नियोजन समिती मधून मावळ तालुक्याला 47कोटी 60लक्ष 39हजार निधी मंजूर झाला असल्याची माहिती माजी मंत्री बाळा भेगडे यांनी दिली.
पुणे जिल्हा नियोजन मंडळाच्या माध्यमातून मावळ तालुक्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस , पालकमंत्री चंद्रकांत  पाटील यांच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यामध्ये 47कोटी 60लक्ष 39हजार रुपयांच्या निधीची विकास कामांना मंजुरी देण्यात आली आहे अशी माहिती यावेळी माजी मंत्री बाळा भेगडे यांनी दिली.
माजी मंत्री बाळा भेगडे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात ही माहिती दिली.
पुणे जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने भारतीय जनता पार्टी व बाळासाहेबांची शिवसेना यांना एकत्र घेऊन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस साहेब पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करत निधीची मागणी केली होती  जिल्हा पुणे जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यामध्ये 47कोटी 60लक्ष 39हजार रुपये मंजूर झालेले आहेत या पुढील काळात भारतीय जनता पार्टी व बाळासाहेबांची शिवसेना सरकारच्या माध्यमातून मावळ तालुक्याला कोटे रुपये रुपयांचा निधी यापुढील काळात मिळवण्यासाठी प्रयत्न करणार आहोत असे ही भेगडे म्हणाले.
माजी मंत्री बाळा भेगडे म्हणाले,”जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून जिल्ह्याला निधीची तरतूद करत असताना मावळ तालुक्यातील विद्यमान आमदारांनी सुचविलेल्या मागील काळातील विकासकामांना देखील कोणतीही स्थगिती न देता 100% निधी देण्याचं काम केलं असून यापुढेही कोणतेही राजकारण न करता तालुक्याच्या विकासासाठी कटिबद्ध असू.

error: Content is protected !!