टाकवे बुद्रुक :
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतलेल्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला.आंदर मावळातील आदिवासी दुर्गम भागातील तळपेवाडीचा सागर किसन तळपे यांची उत्पादन शुल्क विक्रीकर निरीक्षक (STI) पदी नियुक्ति झाली.
या बद्दल माजीमंत्री बाळा भेगडे यांच्या उपस्थितीत सागरची तळपेवाडी ग्रामस्थांनी मिरवणूक काढून अभिनंदन केले. माजी उपसभापती शांताराम कदम यांच्यासह भाजपाचे अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. तर माजी उपसरपंच रोहिदास असवले यांनी सागर तळपे यांच्या घरी तळपेवाडी येथे जाऊन सागर यांच्या आईचा वडिलांचा व भावाचा घरी जाऊन सर्व कुटुंबाचा सत्कार केला.
मावळ तालुक्यातील अतिशय दुर्गम आदिवासी भागात तळपेवाडी बंडक-यांची पार्श्वभूमी असताना ( सावकारीचा विरोधात लढणारे आजोबा-पंजोबा ) असलेल्या कुटुंबात सागर यांचा जन्म झाला! आजोबांची पिढी गेली. सागरचे वडील किसन तुकाराम तळपे यांनी केवळ अजोबांनी दिलेल्या दोनशे रुपयाच्या जोरावर दुकानदारीचा व्यावसाय सुरू करत घर कुटुंब सांभाळात होते.
गावाकडे दुर्गम भाग असल्याने व शिक्षणाची चांगली सोय नसल्याने मोठी बहिण अलका व त्यांचे पत्नी श्री भिकाजी केंगले यांनी सागराला शिक्षणासाठी उंब्रज, ता जुन्नर् जि.पुणे येथे नेले. सागरचे दाजी तेथिल जि.प.प्रा.शाळेत शिक्षक होते.त्यामुळे पाचवी पर्यंत शिक्षण तेथे झाले.
बहिण अलका व सागरचे दाजी श्री केंगले सर याच्या अथक प्रयत्नांती जवाहर नवोदय विद्यालय पुणे. या CBSC बोर्ड असलेल्या विद्यालयात जुन्नर तालुक्यातुन सागरची निवड झाली, व सहावी ते बारावी पर्यंतचे शिक्षण पूर्ण करत असताना, CBSC बोर्डाने 10 वी ला 87% व 12 वी ला 73 % ने उत्तीर्ण होऊन, फर्ग्युसन कॉलेज’ पुणे येथे, BSC – Physics या विषयात प्रथम श्रेणी ने उत्तीर्ण होऊन पदवीचे शिक्षण पुर्ण केले.
या सर्व प्रवासात तळपेवाडी गावात छोटे दुकान संभाळूण व शेती करून अथक परिश्रम करत माझ्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च आईवडिलांनी केला.
सागरच्या वडिलांनी गाडी चालवून व शेती करत चार मुली व दोन मुले अशा सहा जणांचा सांभाळ केला. सागरच्या आई-वडिलांना खुप तारेवरची कसरत करावी लागली.पण त्यांचे हे कष्ट शेवटी सत्करणी लागल्याचे समाधान सागरला वाटते.
यश- अपयशाच्या पायऱ्या चढत असताना या यशापर्यंत पोहचण्यासाठी सागरची बहिण अलका केंगले, मुक्ता लोटे, सुनिता भालिंगे, प्रतिमा भोते तसेच सागरचे दाजी भिकाजी केंगले, संदिप लोटे, दिलिप भालिंगे, दत्तात्रय भोते. लहान भाऊ कैलास तळपे , आई सुभद्रा व वडिल किसन तुकाराम तळपे यांचे प्रेमळ प्रयत्न व साथ फार मोलाची आहे. तसेच माझे शिक्षकवर्ग व मित्रपरिवार यांचे ही योगदान खूप मोलाचे ठरते.
दरम्यान, तळपे यांचे भाजपाचे टाकवे नाणे जिल्हा परिषद गट अध्यक्ष रोहिदास असवले, तुकाराम कोद्रे, रवींद्र आंद्रे, दत्तात्रय असवले, काळूराम घोजगे, दत्ता म्हसे, विकास असवले, रोहिदास जांभुळकर,पांडुरंग आलम,अमोल भोईरकर,मुन्नावर आत्तार,काशिनाथ जांभुळकर उपस्थित होते.