कामशेत:
श्रीक्षेत्र गोवित्री साबळेवाडी फाटा येथील श्रीसंत तुकाराम महाराज पादुका प्रतिष्ठान (ट्रस्ट)च्या अध्यक्ष पदी बबनराव शंकर कोंढरे व सचिव पदी विनायक तानाजी पोटफोडे यांची निवड करण्यात आली.  श्रीक्षेत्र गोवित्री साबळेवाडी फाटा येथील संत तुकाराम महाराज पादुका प्रतिष्ठान (ट्रस्ट)च्या कार्यालयात संस्थापक बाळासाहेब नेवाळे यांच्या प्रमुख उपस्थितीत  विश्वस्त मंडळाची बैठक पार पडली.
या बैठकीत अध्यक्ष पदी कोंढरे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.पंचवार्षिक कालावधी करिता विश्वस्त मंडळाची  निवड घोषित करण्यात आली आहे.
नाणे मावळातील सुमारे ३५ गावांची ही ट्रस्ट  आहे. २००६ साला पासून ट्रस्टच्या माध्यमातून विविध सामाजिक व धार्मिक उपक्रम राबविण्यात येत आहे.
विशेषत: सामुदायिक विवाह सोहळा या ट्रस्टच्या पुढाकारातून झाला असून सामुदायिक विवाह सोहळयाची चळवळ अधिक जोमाने वाढायला मदत झाली असल्याचा इतिहास आहे.संत तुकाराम महाराज  बीज सोहळ्याचा मोठा धार्मिक उत्सव दरवर्षी  या प्रांगणात होत असतो. तसेच दर  पंधरा  दिवसाच्या दशमीला येथे प्रवचन,हरिपाठ,अन्नदान केले जाते.कोजागिरी पौर्णिमेला दरवर्षी काकडा आरती सोहळा होते. या सोहळ्याची सांगता कोंडेश्वर दिंडीच्या पायी प्रस्थान दरम्यान केले जाते.
पुढील पंचवार्षिक कालावधी करिता निवडलेली कार्यकारणी पुढील प्रमाणे:
अध्यक्ष- बबनराव शंकरराव कोंढरे,विश्वस्त- तुकाराम मारुती नाणेकर पाटील, रमेश भिकाजी  पिगळे,सबाजी रघुनाथ कुढले,गबळू धोंडिबा शिरशट,वसंतराव लक्ष्मण टाकळकर,बाळासाहेब दामू गायकवाड,विलासराव दत्तू धुमाळ,सदाशिव श्रीपती पेटकर,अंकुश रामभाऊ कदम,चंद्रकांत  दशरथ मोहळ,खंडू शिवराम पवार,विनायक तानाजी पोटफोडे (सचिव) यांची निवड करण्यात आली आहे.
तर अनंता गेनू गायकवाड,ज्ञानेश्वर गेनू कोंडे,गजानन बारकू गाडे,देवराम ज्ञानेश्वर मोकाशी,तुकाराम भिवा धुमाळ,तुकाराम रामभाऊ शिंदे,अशोक आत्माराम बांगर,गोविंद शंकर साबळे,श्रीरंग यादव ढवळे, मधुकर दत्तू गायकवाड,अंकुश  शंकर लोहट,कैलास शंकर वाघमारे,हनुमंत विठ्ठल कचरे, अंकुश विष्णू गायकवाड,रमेश शांताराम गरूड,बबनराव महादू शेवाळे (पुजारी)यांची सल्लागार पदी निवड करण्यात आली आहे.

error: Content is protected !!