पुणे:
प्रेम, एकात्मता आणि सद्भावनेचं प्रतीक असलेल्या ‘ भारत जोडो यात्रेत आमदार रोहीत पवार  सहभागी झाले. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहूल गांधी  यांची आमदार पवार यांनी  भेट घेतली. राज्यातील व आमदार रोहीत पवार यांच्या मतदारसंघातील शेतकरी, कष्टकरी, महिला भगिनी आणि युवांच्या वतीने खासदार गांधी यांना काही भेटवस्तू देण्यात आल्या.
आमदार रोहीत पवार अंत्यत कल्पकताशील नेते आहे.त्यांच्या संकल्पनेतून खासदार राहुल गांधी यांना आदिशक्ती आणि भक्ती-शक्तीचं प्रतीक असलेली प्रतिकृती, वारकरी संप्रदायाचं प्रतीक असलेलं उपरणं, जगातील सर्वांत उंच ‘स्वराज्य ध्वजा’ची प्रतिकृती तसंच लोकनेते शरदचंद्र पवार साहेबांचं इंग्रजी आत्मचरित्र ‘On my terms’, थोरामोठ्यांच्या कार्याचा आढावा घेणारा लोकमान्य ते महात्मा हा ग्रंथ देऊन गांधी यांचा सन्मान करण्यात आला.
तसेच जगाला शांतीचा संदेश देणाऱ्या गौतम बुद्धांचा Gotama the Buddha:Son of Earth हा ग्रंथ आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांनी पंढरपूरच्या वारीच्या काढलेल्या निवडक छायाचित्रांचा संग्रही खासदार गांधीना दिला.

error: Content is protected !!