टाकवे बुद्रुक:
निगडे ता.मावळ  येथे कोजागिरी पौर्णिमेला सुरू झालेल्या काकडा आरती सोहळ्याची काल्याच्या किर्तनाने सांगता झाली.  किर्तनकार ह.भ.प. ह.भ.प.बालाजी महाराज म्हस्के यांचे काल्याचे किर्तन झाले.
किर्तन सोहळ्यास गावातील नागरिक बंधू भगीनीनी बहुसंख्येने उपस्थित होत्या. महिना भर सुरू असलेल्या काकडा आरती सोहळ्यात संताच्या अभंगांतून सावळ्या विठूरायाची भक्तातांनी आराधना केली.
उठा पांडुरंगा आता दर्शन द्या सकळा!चा अशी आर्त विनवणी करीत लाडक्या विठूरायाच्या भक्तीचे गोडवे गायले गेले. भूपाळया, अभंग, गवळणी, महाआरती आणि पसायदानाने काकडा आरती सोहळा संपन्न झाला. काल्याच्या महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.

You missed

error: Content is protected !!