कामशेत:
पिंपळोली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या  विद्यार्थी दिनाचे औचित्य साधुन विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.  जि.प.प्रा.शाळा पिंपळोलीमध्ये  मुलांसाठी रांगोळी,चित्रकला , निबंधस्पर्धा,वकृत्व स्पर्धा,हस्तकला स्पर्धा मधील  विजेत्यांना   गौरविण्यात आले.
रिपाईचे अध्यक्ष सुर्यकांत वाघमारे  यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला .हस्तकला स्पर्धेत प्रथम क्र.प्राजक्ता गोरख पिंपळे द्वि सोहम विजय पिंपळे तृ.माधवी गोरख पिंपळे तर निबंध स्पर्धेत किर्ती सुनिल चौरे, श्रेया संदिप दरडे ,अस्मिता समिर चौरे व वकृत्वस्पर्धेत आर्यन पानसरे,आर्या गणेश गुजर ,अथर्व बोंबले,रांगोळी स्पर्धेत,अमृता भाऊ केदारी,सोनाक्षी सुभाष गायकवाड  जय पिंपळे व चित्रकला स्पर्धेत ,प्रणव सावंत,अनुष्का बोंबले,आयुष कैलास पिंपळे स्पर्धेत बाजी मारली.  शाळेचे सोमवंशी सर,रोकडेमॕडम,घोडेकर मॕडम,बारावरकर मॕडम ,होनावळे मॕडम यांनी ही सहकार्य केले काही मान्यवरांचे सत्कार समारंभ  संपन्न झाला .
ताजे गावातील एक उभरता कलाकार  असणारा कु,रवीशेठ केदारी यांचा खास गौरव करण्यात आला पिंपळोली मधील कन्या कु स्वाती अरुण बोंबले हिचा ही यामध्ये सन्मान करण्यात आला, तसेच कराटे मध्ये गोल्डमेडल मिळवलेली अपेक्षा सुनिल गुजर,व ॲडवकेट विराज पिंपळे  भाजे व कामशेट मध्ये कराटे क्लास मध्ये उत्कृष्ठ कामगिरी करणारे विद्यार्थी यांचा सन्मान करण्यात आला.
त्यामध्ये खास करुन महिलांसाठी एक खास कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते “खेळ रंगला पैठणीचा” प्रथम क्रमांक एक पैठणी आणि द्वितिय क्रमांक सोन्याची नथ आणि तृतीय क्रमांकास चांदिचा छल्ला आणि महिलांसाठी”लकी ड्रा, आकर्षक  बक्षिस ठेवण्यात आली होती, या मध्ये महिला वर्गानी मोठ्या प्रमाणात उत्स्पुर्तपणे सहभाग नोंदवला , विशेष सहकार्य मा.समिर आण्णा जाधव.( पुणे युवक जिल्हाध्यक्ष RPI ) मा.विजय गोपाळराव देसाई ( वरिष्ठ उपाध्यक्ष मावळ RPI ) मा.कुमार भोसले साहेब यांनी मोलाचे योगदान केले. तसेच या कार्यक्रमासाठी मा.सुर्यकांतजी वाघमारे आरपीआय पश्चिम महाराष्ट्र प्रमुख, लक्ष्मण भालेराव तालुका प्रमुख आरपीआय व समीर अण्णा जाधव पुणे जि.यु.अध्यक्ष विजय देसाई साहेब वरिष्ठ उपाध्यक्ष आरपीआय ,कुमार भोसले साहेब    तसेच पिंपळोलीचे सरपंच निलम सुतार,रेशमा गायकवाड ग्रा.पं.सदस्या,मा,चेअरमन सोपानशेठ पिंपळे ,उद्योजक सुनिलशेठ गुजर आरटीआय अध्यक्ष ,अरुणशेठ बोंबले उपस्थित होते.
  यावेळी या कार्यक्रमासाठी गावासाठी सतत कार्यरत असणारे सदस्य गावाच्या सांस्कृतिक कार्यक्रमात कधी ही खंड पडु न देणारे गेल्या तीन वर्षात कोरोनाकाळामध्ये ही गावाला मदत करणारे  गावासाठी सतत धडपडणारे गावातील लोकप्रिय सदस्य मा.सिध्दार्थ चौरे आरपीआय अध्यक्ष नाणेमावळ,ग्रा,पं.सदस्य,रिक्षा संघटनेचे अध्यक्ष यांच्या कल्पनेतुन गावामध्ये असे कार्यक्रम साजरे होत आहे  पिंपळोली गाव हे एक मावळ तालुक्यात नावाजलेले गाव आहे गावातील लोकांना महिला वर्गांना या कार्यक्रमामुळे हक्काचे व्यासपीठ मिळाले.
   एक आनंदाचे वातावरण निर्माण झाले मनोरंजन बंद झाल्यास गावातील महिला वर्ग हा मनोरंजनासाठी आग्रही असतो याचीच दक्षता घेऊन  कृतीतुन खरे करुन दाखवले त्यांना सहकार्य लाभले ते गावातील तंटामुक्त अध्यक्ष शिवसेनेचे उपविभाग प्रमुख सिनेनाट्य अभिनेते मा.संतोष बोंबले,तसेच मा.उपसरपंच संदिप चौरे यांचे कार्यक्रमाचे नियोजन योग्य रितीने  करण्यात आले व कार्यक्रमाचे आभार मा.श्री पुणे जि.आरटिआय प्रमुख सुनीलशेठ गुजर यांनी केले गावातील महिला वर्गांनी देखील यांची खुप प्रशंसा केली यावेळी गावातील प्रमुख महिला उपस्थित होत्या त्यामध्ये गावातील महिला मंडळ अध्यक्षा श्रीमती वत्सलाताई गुजर,आशास्वयंसेविका बचतगट अध्यक्षा सौ,स्वपनाताई बोंबले,राष्ट्रवादी युवती मा.ता.उपाध्यक्षा सौ,प्रमिलाताई बोंबले,तसेच बचत गट अध्यक्षा रुपालीताई चौरे, सचिव रेखाताई पवार,स्नेहाताई चौरे,सारिकाताई पिंपळे,रेशमाताई पिंपळे,मंदाताई  लोखंडे आणि इतर महिला वर्ग उपस्थित होत्या यामध्ये पैठणीचा मान मा.सौ.पुनमताई भगवान बोंबले यांना मिळाला तर द्वितिय क्रमांक सोन्याची नथ सौ.स्वप्नाताई सोमनाथ गुजर यांना तर तृतीय क्रमांक चांदीचा छल्ला सौ.स्वप्नाताइ संतोष बोंबले यांना मिळाला तसेच लकी ड्राॕ सोडतमध्ये प्रथम क्रमांक जिजाबाई तुकाराम लोखंडे,द्वितीय क्रमांक अलकाबाई सोपान पिंपळे,तृतीय क्रमांक प्रमिला गोरख बोंबले यांना मिळाला.

error: Content is protected !!