किशोर आवारे यांना समाज भूषण पुरस्कार जाहीर
तळेगाव स्टेशन:
जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांना महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभा पुणे यांच्या वतीने डॉ. निर्मलकुमार फडकुले यांच्या स्मृतीदिना प्रित्यर्थ  समाजभूषण पुरस्कार जाहीर झाला.
महाराष्ट्र साहित्य कला प्रसारीणी सभा पुणे यांचे विद्यमान अध्यक्ष उध्दव कानडे यांनी हा पुरस्कार जाहीर केला आहे.
किशोर आवारे यांचे कोरोना काळातील कार्य तसेच कोल्हापूर व चिपळूण पूर परिस्थितीमध्ये आवारे केलेली कार्य समाजासाठी मार्गदर्शक ठरले असून समाजासाठी अत्यंत भूषणावह आहे त्यामुळेच आवरे यांना समाज भूषण पुरस्कार देताना मनस्वी आनंद होत आहे असे प्रतिपादन अध्यक्ष उद्धव कानडे यांनी केले आहे.
शनिवार दिनांक 29 ऑक्टोबर रोजी सायंकाळी पाच वाजता ज्येष्ठ साहित्यिक समीक्षक डॉ नागनाथ कोत्तापल्ले यांच्या शुभहस्ते व ज्येष्ठ साहित्यिक भारत सासणे यांच्या अध्यक्षतेखाली सदर पुरस्काराचे वितरण होणार आहे.
महाराष्ट्र साहित्य कला प्रसारीणी सभा पुणे, यांचा पुरस्कार हा पुण्यातील साहित्य वर्तुळात अत्यंत मानाचा मानला जात असल्याने किशोर आवारे यांच्यावर सर्वच स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

error: Content is protected !!