टाकवे बुद्रुक:
आमदार  सुनील शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोंडीवडे येथील विद्यार्थ्याना कडू पाटील स्नेह ग्रूप यांच्या वतीने शालेय उपयोगी साहित्य व खाऊ वाटप करण्यात आले.
पोलीस पाटील श्री निलेश कडू, युवा उद्योजक श्री नितीन कडू, युवा उद्योजक आकाश कडू, ज्येष्ठ नागरिक श्री.कैलास शिंदे, उपाध्यक्ष आंदर मावळ  राष्ट्रवादी युवक काँग्रेस श्री अजित कडू, मुख्याध्यापक श्री. तानाजी भोसले सर, श्री. दत्तात्रय यादव सर, सौ. शिल्पा बडगुजर ,  सौ. संपदा तळावडे , सौ.अनिता लामगण ,  सौ.रुपाली कडु उपस्थित होते.
विद्यार्थांच्या हस्ते केक कापून आमदार सुनील शेळके यांना वाढदिवासाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री अजित कडू यांनी केले व आभार मुख्याध्यापक श्री तानाजी भोसले यांनी मानले.

You missed

error: Content is protected !!