अपक्ष उमेदवार बापूसाहेब भेगडे यांचा आंदर मावळ दौरा


आंदर मावळ: मावळातील एका गावातील रस्त्यासाठी 42 लाख रुपये खर्च केले. पण रस्ता, पूलही अस्तित्वात नाही. त्यामुळे पूल, रस्ता हरवला आहे, अशा तक्रारी पोलीस स्टेशनला द्याव्यात की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. आम्ही पुराव्यासह आमदार शेळके यांच्या विकासाचा पंचनामा करणार आहोत, असा इशारा भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष गणेश भेगडे यांनी दिला.
              सर्वपक्षीय अपक्ष व जनतेचे उमेदवार बापूसाहेब भेगडे यांच्या प्रचारार्थ आज आंदर मावळातील राजपुरी, बेलज, टाकवे, फळणे, माऊ, वडेश्वर नागाथली, वहाणगाव, कुसवली, बोरवली, कांब्रे, डाहुली, कुसुर, खांडी, निळशी, सावळा, माळेगाव खुर्द, तळपेवाडी आदी गावांमध्ये प्रचारदौरा झाला. मतदारांनी प्रत्येक गावात फुलांच्या पायघड्या, फुलांच्या पाकळ्यांची उधळण, फटाक्यांची आतिषबाजी करीत स्वागत केले. महिलांनी औक्षण करीत विजय तिलक लावला. यावेळी या सर्व गावांच्या ग्रामस्थानसह शिवसेना (उबाठा) पक्षाचे तालुकाप्रमुख आशिष ठोंबरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय पडवळ, मनसेचे तालुकाध्यक्ष रुपेश म्हाळसकर, माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना गणेश भेगडे म्हणाले, की माणसाने नम्र असावे, मीपणा रावणाचाही अंत करून गेला, हे विरोधकांनी लक्षात ठेवावे. तालुक्यात कार्यकर्ते संकल्पना संपुष्टात आणली आहे. मलिदा गँगचे यांचे कार्यकर्ते असतील, तर यांचा अध्यक्ष कोण ? आमदार शेळकेंच्या भोवतीच पोलिसांचा गराडा असेल, तर ते नागरिकांना सुरक्षा काय देणार ? असा सवालही गणेश भेगडे यांनी केला.
बापूसाहेब भेगडे, अपक्ष उमेदवार, मावळ विधानसभा म्हणाले, ” मावळची संस्कृती बिघडवण्याचा प्रयत्न केला जातोय. खोटे बोलून नको त्या विकासाच्या गप्पा मारू नका. विद्यमान आमदाराने तालुक्याची लिमिटेड कंपनी करून टाकली आहे, असे होऊ द्यायचे नसेल, तर परिवर्तन घडवण्याची जबाबदारी मतदारांवर आहे. विद्यमान आमदारांनी प्रत्येक घटकाला दुखावण्याचे काम केले आहे. गाव संघटित ठेवण्यासाठी, गावगाडा चालवण्यासाठी सर्वांनी एकत्र राहून प्रयत्न करण्याची आवश्यकता असते. टाकवे गावातून कंपन्या बाहेर का गेल्या, दूध व्यवसाय येथून स्थलांतरित का झाले याचा गांभीर्याने विचार होण्याची गरज आहे का नाही ? कान्हे येथील पूल अद्याप का केला गेला नाही. हा पूल झाला असता तर इंडस्ट्री बाहेर जाण्याचा प्रश्नच नव्हता. इंडस्ट्रीज बाहेर गेल्यामुळे तरुणांना रोजगार देणे देखील कठीण बनले आहे. त्यामुळे गेल्या पाच वर्षात हा पूल होणं आवश्यक होतं. महिला सक्षमीकरण तरुणांच्या हाताला काम हेच आपले व्हिजन आहे.
         –

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!