
लोणावळा – दरवर्षी लोणावळ्यात श्रोत्यांना विविध विषयावरील व्याख्यानांची पर्वणी वसंत व्याख्यानमाला समिती यांजकडून मिळत असते. याही वर्षी २१ एप्रिल पासून विविध पुष्प सुमणांची गुंफन लोणावळ्यातील रसिक श्रोत्यांना ऐकायला व अनुभवायला मिळणार आहे.
निसर्गसौंदर्याने नटलेल्या लोणावळा नगरीत ३ मे २००३ रोजी स्वर्गीय प्रकाशभाई मोहाडीकर यांच्या प्रेरणेने स्थापन झालेली वसंत व्याख्यानमाला २३ व्या वर्षात पदार्पण करत आहे. नवनवीन वक्ते आपणासमोर सलग सात दिवस विचारधन घेऊन येणार आहेत. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी विविध क्षेत्रातील मान्यवर, विचारवंत, तज्ज्ञ साहित्यिक, कलाकार, प्रेरणादायी व्यक्तिमत्वे आपल्यासमोर मौलिक विचार मांडणार आहेत. आणि आपणाशी संवाद साधणार आहेत. यामध्ये सोमवार दि. २१एप्रिल २०२५ रोजी सौ. मधुराणी गोखले प्रभुलकर यांची प्रकटमुलाखत ‘मधुराणीचा जीवनपट ‘याविषयावर होणार असून: कु. अनघाताई मोडक या मुलाखत घेणार आहे
मंगळवार दिनांक २२एप्रिल २०२५ रोजी प्रा. मॅक्सवेल लोपेस, वसई यांचे ‘संत मीराबाई’ याविषयावर व्याख्यान आयोजित केले आहे.
बुधवार दि.२३एप्रिल २०२५ रोजी डॉ. नीतिन आरेकर यांचे ‘मला भेटलेली माणसे’याविषयावर विचारमंथन होणार आहे
गुरुवार दि.२४एप्रिल २०२५ रोजी मराठी अभिनेते श्री. स्वप्निल राजशेखर यांचे Total Filmy आणि सामाजिक बांधीलकी याविषयावर व्याख्यान होणार आहे.
शुक्रवार दि.२५एप्रिल २०२५ रोजी
श्री शरद कुलकर्णी, श्री संभाजी राव गुरव, सौ. मेघा परमार आणि बाल गिर्यारोहक कु. अन्वी घाटगे यांच्याबरोबर हिमालयाची साद या विषयावर संवाद साधला जाणार आहे
शनिवार दि.२६ एप्रिल २०२५रोजी श्री. सुधांशु नाईक, सौ. आश्लेषा महाजन, सौ. आरती परांजपे, श्री. प्रसाद नातू यांचा तेजस्वी स्वा. सावरकर यांची स्फूर्ती गाथा या विषयावर कार्यक्रम होणार आहे.तर शेवटच्या दिवशी रविवार दि २७एप्रिल २०२५ रोजी सुमधुर संगीताचा कार्यक्रम ‘गोष्ट एका राजहंसाची संगीताचा अलौकिक प्रवास’ कु. अनघाताई मोडक आणि ग्रुप सादर करणार आहेत.
श्रोत्यांना नवनवीन विषय ऐकवण्यासाठी वसंत व्याख्यानमाला समिती नेहमीच तत्पर असते. त्यामुळे लोणावळ्यातील नागरिकांसह ग्रामीण भागातील नागरिकांनीही या कार्यक्रमाचा आवश्य लाभ घ्यावा असे आवाहन वसंत व्याख्यानमाला समितीच्या अध्यक्षा सौ राधिकाताई भोंडे यांनी केले आहे.
यावर्षीच्या कार्यकारणी मध्ये सौ स्वरूपा देशपांडे यांची अध्यक्षा म्हणून तर श्री नितीन तिकोणे उपाध्यक्ष सचिव सौ वैशाली साखरेकर सहसचिव श्री संजय वाड कोषाध्यक्षा चारूलता कमलवार सह कोषाध्यक्षा संयोगिता साबळे, समन्वयक श्री प्रशांत पुराणिक, श्री आनंद गावडे, प्रसिद्धी प्रमुख सौं. श्रावणी कामत यांची निवड करण्यात आली असल्याचे सौ राधिकाताई भोंडे यांनी सांगितले.
- न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेजच्या माजी विद्यार्थ्यांचा १ मेला भव्य मेळावा : QR कोड स्कॅन करून सहभाग नोंदवा
- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मोहत्सव
- तहसील कार्यालयाच्या वतीने मावळात लोकशाही दिन
- २१ एप्रिल पासून लोणावळ्यात वसंत व्याख्यानमालेचे आयोजन
- अक्षय तृतीयेला तळेगावात भगवान श्रीपरशुराम जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन

