तळेगाव दाभाडे : आईटीई पुणे केंद्र आणि नूतन अभियांत्रिकी यांच्या संयुक्त विद्यमाने नूतन अभियांत्रिकीमध्ये राष्ट्रीय पातळीवरील प्रकल्प स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेमध्ये एकूण ३८ संघ सहभागी झाले होते.
   या प्रसंगी आईटीई पुणे चे सचिव डॉ. डी. एस. मंत्री हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. अभियांत्रिकीचे सीईओ डॉ. रामचंद्र जहागीरदार, प्राचार्य डॉ. एस.एन. सपली, डॉ. विलास देवतारे, डॉक्टर अश्विनी शिंदे, कार्यक्रम समन्वयक नीता कऱ्हाडकर आदी मान्यवर उपस्थित होते.
कृषीक्षेत्रावर आधारित ऍग्रीबोट, पार्सल गार्ड, नॅनोबबल्स टेक्नॉलॉजी यांसारखे आदी प्रकल्पांचे सादरीकरण करण्यात आले. स्पर्धेचे परीक्षक म्हणून डॉल्फिन लॅबचे चित्तरंजन महाजन, एम्बइडेड विद्या चे सीईओ शुभम रामगुंडेवार , एनएमआईटीचे माझी विद्यार्थी दिपक घुले हे होते.
  ‘पर्यावरण आणि मानवाचा त्यावरील टिकाव ही संकल्पना एकमेकांशी कशी संबधीत आहे.  टिकाऊपणा म्हणजे सध्याच्या भविष्यातील पिढ्यांच्या गरजा पूर्ण करणे, त्याचवेळी पर्यावरणावर नकारात्मक परिणाम टाळणे यात नैसर्गिक संसाधनांचा योग्य वापर करून प्रदूषण कमी करून जैवविविधता टिकवून ठेवली पाहिजे, असे मत डॉ. मंत्री यांनी बोलताना व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अथर्व मुटकुळे या विद्यार्थ्याने केले सर्व हरिओम कटाकट्टी, ओम पोकळे, हरिप्रिया या विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.

error: Content is protected !!