
वडगाव मावळ : मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा,महाराष्ट्र राज्य रोजगार हमी योजनेच्या प्रमुखपदी निवड झाल्याबद्दल आमदार सुनिल शेळके यांचा व श्री. संत तुकाराम सहकारी साखर कारखाना निवडणूकीत बिनविरोध निवडून आलेल्या नवनिर्वाचित संचालकांचा सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष गणेश खांडगे यांनी दिली.
मंगळवार दि. १ एप्रिल ला सकाळी १० वाजता शासकीय विश्रामगृह, वडगाव ता. मावळ येथे हा मेळावा होणार आहे.मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ते,राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व सेल अध्यक्ष, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन तालुकाध्यक्ष गणेश खांडगे, महिलाध्यक्ष दिपाली गराडे, युवक अध्यक्ष किशोर सातकर यांनी केले आहे.
- कर्तृत्वाने मोठे होऊन चांगले वागा: देशमुख महाराज
- मोरया प्रतिष्ठानच्या वतीने वडगावात टँकरने मोफत पाणी पुरवठा
- शनिवारी वडगावमध्ये पोटोबा महाराजांचा उत्सव
- रिपब्लिकन पक्षाचे राज्यस्तरीय अभ्यास शिबीर कामशेत येथे संपन्न : रामदास आठवले यांनी केले मार्गदर्शन
- राज्यस्तरीय मंथन शिष्यवृत्ती परीक्षेत पैसाफंड शाळेचे यश

