
काळेवाडी : जागतिक महिला दिनानिमित्ताने रविवार ,दिनांक 9 मार्च रोजी पार्वती इंग्लिश स्कूल भारत माता चौक काळेवाडी येथे महाराष्ट्र लोकधारा न्यूज प्रथम वर्धापन दिनानिमित्त विविध क्षेत्रातील 11 कर्तुत्वान महिलांचा सन्मान सोहळा व निवेदक प्रा .सोमराज नाडे प्रस्तुत खेळ पैठणीचा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
सायं.७.०० वाजता राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ ,क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला प्रमुख मान्यवरांच्या हस्ते व पत्रकारांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुणे चिंचवड विधानसभा प्रमुख संगीता कोकणे, उपाध्यक्ष मनसे महिला आघाडी अनिताताई पांचाळ,समाजप्रबोधनकार शारदाताई मुंढे ऍड.स्नेहाताई कांबळे, ॲड. पल्लवी विग्ने, तृप्ती भद्रे, संगीता मोरे मॅडम यांच्या हस्ते महिला भगिनींना सन्मानित करण्यात आले.
महाराष्ट्र लोकधारा न्यूज चॅनल च्या वतीने या कार्यक्रमात शहरातील विविध क्षेत्रातील कर्तुत्वान महिलांचा शाल, सन्मान चिन्ह, सन्मानपत्र, पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. तसेच परिसरातील आठ महिला बचत गटांना त्यांच्या कार्याबद्दल त्यांना आदर्श महिला बचत गट म्हणून सन्मानित करण्यात आले. जागतिक महिला दिनानिमित्ताने खास महिलांसाठी गप्पा ,गोष्टी, मनोरंजन, खेळ , उखाणे याचा सदाबहार नजराना म्हणून प्रामुख्याने खेळ पैठणीचा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
काळेवाडी परिसरातील मोठ्या संख्येने माता भगिनींनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावली. या कार्यक्रमांमध्ये शेकडोच्या संख्येने महिलांचा समावेश होता. या कार्यक्रमांमध्ये महिलांना पहिल्या, दुसऱ्या, व तिसऱ्या क्रमांकाला मानाची पैठणी व पाच लकी ड्रॉ,प्रथम क्रमांक सोन्याची नथ, दुसरा क्रमांक मिक्सर, तिसरा क्रमांक इस्त्री , चौथा व पाचवा क्रमांक क्रॉकरी सेट देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी खेळ पैठणीचा या कार्यक्रमांमध्ये अनेक प्रकारचे खेळ घेण्यात आले .
यामध्ये सर्व महिलांना आकर्षक भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य करणारे जय व्हिजन मास्टरमाईंड अकॅडमीचे संचालक उद्योजक मनोज भोयर,प्रा. पद्माकर मोरे सर, यांचे विशेष सहकार्य लाभले.
महाराष्ट्र लोकधारा न्यूज प्रथम वर्धापन दिनानिमित्त पिंपरी चिंचवड शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी महावीर जाधव संपादक महाराष्ट्र लोकधारा न्यूज चॅनला वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देऊन त्यांच्या कार्याबद्दल गौरव करण्यात आला. यावेळी शहरातील सर्व पक्षीय नेत्यांनी व पदाधिकारी यांनी कार्यक्रमाला हजेरी लावली. पिंपरी चिंचवड पत्रकार संघ व सर्व पत्रकार बांधवांनी महाराष्ट्र लोकधारा न्यूज चॅनलला प्रथम वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
- गुरूवारी समर्थ शलाका शिष्यवृत्ती परीक्षा पारितोषिक वितरण सोहळा
- सावित्रीबाई फुले स्मृतिदिनानिमित्त कार्यक्षम महिलांचा प्रातिनिधिक सन्मान
- मनिषा सातपुते बेस्ट लाइफ कोच अवॉर्डने सन्मानित
- नूतन अभियांत्रिकीमध्ये महिला दिन उत्साहात साजरा
- बजरंग बलीचा प्राणप्रतिष्ठा व लोकार्पण सोहळा संपन्न : सफर 361 किल्ल्यांची सामाजिक प्रतिष्ठान” दुर्गसेवकांचा उपक्रम

