कामशेत :  सांगिसे ता. मावळ येथील बोधिसत्व प्रतिष्ठान संचालित माध्यमिक विद्यालय ,सांगिसे या विद्यालयात जागतिक महिला दिन विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास अध्यक्षा म्हणून कामशेत पोलीस स्टेशनच्या निर्भया पथक प्रमुख निकिता जेजुरकर (काफरे) उपस्थित होत्या.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून पुणे येथील प्राध्यापक डॉ.तुषार काफरे हे उपस्थित होते. यावेळी महिला दिनाचे औचित्य साधून विद्यालयातील विद्यार्थिनींनी विविध नृत्य, नाटक,गाणी इत्यादी बहारदार सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.
यावेळी  निकिता जेजूरकर (काफरे) यांनी महिला-मुलींनी आपल्या सुरक्षाविषयी घ्यायची काळजी याबद्दल सखोल मार्गदर्शन केले. तसेच विविध क्षेत्रातील विशेष कामगिरी केलेल्या थोर महिलांचा आदर्श घेऊन पुढील वाटचाल करावी असे आवाहन केले.यावेळी डॉ.तुषार काफरे यांनी विद्यार्थ्यांना करिअरविषयक मार्गदर्शन केले.
     कार्यक्रमाचे संयोजन संस्थेचे अध्यक्ष गोकुळ गायकवाड व सचिव लहू कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्याध्यापिका सुनिता वंजारी यांनी केले.पाहुण्यांचे स्वागत अंबादास गर्जे यांनी केले. कार्यक्रमाच्या तयारीसाठी विद्यार्थ्यांना ज्ञानेश्वर अरनाळे,अनिल शिंदे यांनी मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन  कार्तिकी खेंगले तर आभार ,सावित्री शिरसट या विद्यार्थीनीने मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सविता शिंदे ,दशरथ ढोरे,स्वप्नाली टाकळकर ,नंदाबाई काळभोर यांनी परिश्रम घेतले.

error: Content is protected !!