
पुणे : एक जानेवारी २४ ते चार मार्च २०२५ या कालावधीत मुदत संपणाऱ्या पुणे जिल्ह्यातील १०८ ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाची आरक्षण सोडत २७ फेब्रुवारी पुणे येथे काढणार आहे. यामुळे ग्रामपंचायतीच्या निवडणूकीचा मार्ग खुला झाला आहे.
ग्रामविकास विभागाच्यावतीने पुणे जिल्ह्यातील बिगर अनुसूचित क्षेत्रातील १ जानेवारी २०२४ ते ४ मार्च २०२५ या कालावधीतील मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीकरिता अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि महिला (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि नागरिकांचा मागास प्रवर्ग यातील महिलांसह) यांच्यासाठी सरपंचपदाचे वाटप करून दिले आहे.
त्याअनुषंगाने जिल्हास्तरावर सरपंचपदाकरिता आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. यानुरूप जिल्ह्यातील सरपंचपदाच्या आरक्षणासाठी सोडत निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी (ता. २७) सकाळी ११ वाजता बहुउद्देशीय सभागृह, पाचवा मजला, जिल्हाधिकारी कार्यालय पुणे येथे होणार आहे.आजी व माजी जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थांनी उपस्थित राहते, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांनी केले आहे.
आरक्षण सोडत काढणार असलेल्या तालुकानिहाय ग्रामपंचायती
■ मावळ : डोंगरगाव, करुंज, तुंग, ठाकूरसाई, कडधे, केवरे, शिलाटणे, नानोली तर्फे चाकण, औंढे खुर्द, ओझर्डे, वराळे, टाकवे खुर्द, पुसाणे, काले, कान्हे, जांभूळ.
■ मुळशी : जवळ, खारवडे, पिंपळोली, रावडे, पोमगाव, भूगाव, मारणेवाडी, कुंभेरी, दारवली, चांदीवली, पिरंगुट, निबे.
■ आंबेगाव : कुरवंदी, पोंदेवाडी, लाखणगाव, देवगाव, वडगावपीर, विठ्ठलवाडी.
■ बारामती : कोळोली
■ दौंड : देलवाडी, नाथाचीवाडी, वासुंदे, देऊळगाव राजे,रोटी, एकेरीवाडी, जिरेगाव, राहू, टेळेवाडी, पिलाणवाडी.
■ हवेली : वडगाव शिंदे, कल्याण, आगळंबे, फुलगाव.
■ पिंपरी चिंचवड : निरगुडी.
■ इंदापूर : उद्धट, कालठण नंबर एक, खोरोची, कांदलगाव, अगोती नंबर एक, वडापुरी, तरडगाव, बोराटवाडी, कालठण नंबर दोन, अगोती नंबर दोन, पवारवाडी, गोखळी, पंधारवाडी, लुमेवाडी, शिरसटवाडी, अवसरी, भाटनिमगाव, नीर निमगाव, शेटफळ हवेली, सुरवड.
■ खेड : खराबवाडी, जऊळके खुर्द, काहिंडे बुद्रुक, सोळू, वडगाव घेनंद, धामणे गुळाणी, रौंदळवाडी,आसखेड बुद्रुक, आंबेठाण, वाशेरे, सायगाव, कडाचीवाडी, बोरदरा, पाईट, कोये, खालुंब्रे, टेकवडी.
■ पुरंदर : शिंदेवाडी, पांगारे, नवलेवाडी, चिवेवाडी, मिसाळवाडी, नावळी, धनकवडी, दवणेवाडी
■ शिरूर : आंबळे, चव्हाणवाडी, कळवंतवाडी, धानोरे,
करडे, ढोकसांगवी, कासारी
■ राजगड : बट्टी बागदरा, आराणी दामगुडा, आसनीमंजाई, सुरवड, वडगाव झांजे
- लोहाराचा भाता हलवित रंगले कविसंमेलन: शब्दधन काव्यमंचचा अनोखा उपक्रम
- लक्ष्मीबाई हरिभाऊ दाभाडे पाटील यांचे निधन
- ग्रामपंचायत निवडणुकीचा वाजला बिगुल सरपंचपदासाठी २७ला आरक्षण सोडत
- फॅशन फ्युजन फेस्टिवल सिझन
- पुणे जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या संचालक पदी संतोष भेगडे


